SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): लोकांशी बोलताना विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. आजचा दिवस मध्यम फलदायी. काही घटनांमुळे ताण वाढू शकतो. अस्थिरतेमुळे मन विचलीत होऊ शकते. तुमची कामे इतर कुणी पूर्ण करेल अशी अपेक्षा करु नका. नोकरीची नवी संधी उपलब्ध होईल. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरुन वाद होऊ शकतो. लक्ष्मी मातेची पूजा करा. वाहन चालवताना काळजी घ्या.

वृषभ (Taurus): आपल्या वर्तनावर कोणी संशय घेणार नाही याची काळजी घ्या. सावध भूमिका घ्या. वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन घ्या. कौटुंबिक खर्च चिंतेत टाकू शकतो. मनाची चंचलता जाणवेल. व्यवसायात चांगला नफा होईल. नव्या नोकरीची संधी उपलब्ध होईल. नातेसंबंधात प्रेमळ आणि आनंदाचे वातावरण असेल. लक्ष्मी मातेची पूजा करा. आरोग्याची काळजी घ्या. आज तुमचे भाग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या अनुयायी आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवाल.

Advertisement

मिथुन (Gemini) : मित्रांचे सल्ले तपासून घ्या. डोळे झाकून निर्णय घेऊ नका. नवीन कार्यात जोडीदाराचा सल्ला घ्यावा. कठोर मेहनतीला पर्याय नाही. कौटुंबिक सौख्यासाठी खर्च कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. काम आणि पैशांची अडचण यामुळे थोडा मानसिक तणाव असेल. लग्नकार्यात अडचणी येऊ शकतात. आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. मित्रांसोबत दिवाळीसाठी घरगुती वस्तूंची खरेदी कराल.

कर्क (Cancer) : कामाचा उरक वाढवावा. मुलांकडून लाभ होतील. संमिश्र घटनांचा दिवस. परोपकाराची जाणीव ठेवाल. घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. वाहन खरेदीबाबत चर्चा कराल. नव्या कामाची सुरुवात कराल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि व्यवसायात चांगला धनलाभ होईल. मित्रांची बऱ्याच दिवसांनी अचानक भेट झाल्याने तुम्हाला वेगळाच आनंद मिळेल. तसेच मुलांना नवीन कपडे मिळू शकतात.

Advertisement

Advertisement

सिंह (Leo) : तुमचा निर्णय समोरची व्यक्ती मान्य करेल. घरातील कामात गुंग राहाल. मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पूर्ण कराल. मित्रांच्या मदतीने महत्त्वाची कामे पार पाडाल. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मित्रांच्या मदतीने अडचणी दूर होतील. रखडलेले काम मार्गी लागेल आणि धनलाभ होईल. तुमच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. नवीन व्यवसायासंबंधी नियोजनावर काम करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.

कन्या (Virgo) : लोकांना बोलण्यातून दिलासा द्यावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात वेळ जाईल. कर्ज मुक्तीसाठी प्रयत्न कराल. नवीन ऊर्जा मिळेल. नवा व्यवसाय सुरू करु शकता. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंबात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. व्यवसायात चांगला नफा होईल. आज तुम्ही कुशलतेने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल.

Advertisement

तुळ (Libra) : व्यवसायात चलती झालेली दिसून येईल. आहाराची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक कामात हिरीरीने भाग घ्याल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. दिवसाची सुरुवात कंटाळवाणी असू शकते. अचानक आर्थिक लाभ होईल. कामाच्या गडबडीत व्यस्त असाल. नव्या योजनाची सुरुवात कराल. हनुमान चालीसा पठण करा. आज चांगल्या लोकांशी संपर्क साधतील, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील.

वृश्‍चिक (Scorpio) : आपल्या मर्जीने दिवस घालवाल. दरवेळेस घाई उपयोगाची नाही. अती उत्साह दाखवू नका. निश्चयाने कामे हाती घ्या. कौटुंबिक गोष्टीत अधिक वेळ रमाल. संपत्तीतून लाभ होईल. नोकरीची नवी संधी उपलब्ध होईल. व्यवसायात चांगला लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. सासुरवाडीतून चांगली बातमी मिळेल. नवीन संवाद तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. आज नशिबाला चांगली साथ मिळेल.

Advertisement

Advertisement

धनु (Sagittarius) : रोजच्या गोष्टी संभ्रमात पाडू शकतात. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. उत्साहाने कार्यरत राहाल. धार्मिक गोष्टीत आनंद मिळेल. अधिकार्‍यांच्या सहकार्याने समस्या दूर होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी चांगली संधी चालून येईल. आरोग्य सुदृढ राहील. मित्र-परिवारांसोबत पार्टी करण्याचा बेत आखाल. प्रवासाचा योग निर्माण होईल. कुटुंबीयांसह दिवाळीच्या सणाची तयारी पूर्ण करणार.

मकर (Capricorn) : जोडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आनंदात जाईल. मित्रांसोबत फिरायला जाल. मुलांसोबत चांगला काळ व्यतीत कराल. कार्यालयातील कामे सकारात्मक परिणाम देतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. वाद-विवाद टाळा. अन्नदान करा. पत्नीसाठी एखादे गिफ्ट घ्याल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : बाहेरचे खाणे टाळावे. उगाच आजारांना निमंत्रण देऊ नका. मित्रांना मदत कराल. अपेक्षित यशासाठी मेहनत घ्यावी लागेल. बोलताना तारतम्य बाळगावे. अचानक धनलाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. आज मित्र परिवारासोबत भेटीगाठी होतील. एखाद्या जवळच्या व्यक्तीला मदत कराल. आज तुमचे भाग्य तुमच्या प्रतिभेतून जागृत होईल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल.

मीन (Pisces) : आपली चूक मान्य करायला शिका. निष्काळजीपणा कमी करावा. जुन्या मित्रांची गाठ घ्याल. शेजार्‍यांची मदत मिळेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. व्यवसायात चांगला लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण असेल. वाहनांच्या खरेदीचा विचार कराल. भावनिक व्हाल, आज विचारपूर्वक बोला.

Advertisement