SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुंतवणुकदारांची होणार चांदी..! ‘एफडी’वरील व्याजदरात ‘या’ बॅंकेकडून मोठी वाढ..

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्याने रेपो रेटमध्ये वाढ होतेय. गेल्या आठवड्यातच ‘आरबीआय’ने रेपो दरात 0.35 टक्के वाढ केली होती. त्याचा बॅंकिंग व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक बॅंकांचे कर्ज महागले असले, तरी मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यात आता देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचीही भर पडली आहे.

‘एसबीआय’ने नुकतीच आपल्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने दोन कोटी रुपयांपर्यंतच्या किरकोळ एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवे दर 13 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. नवीन ठेवी आणि मुदत ठेवींचे नूतनीकरण करताना, हे नवे व्याजदर लागू होतील. याबाबत सविस्तर माहिती स्टेट बँकेने आपल्या वेबसाइटवर दिली आहे.

Advertisement

‘एसबीआय’चे नवीन व्याजदर

  • 7 ते 45 दिवस – 3 टक्के
  • 46 ते 179 दिवस – 3.9 टक्के
  • 180 ते 210 दिवस – 5.25 टक्के
  • 211 दिवस ते एक वर्ष – 5.75 टक्के
  • 1 ते 2 वर्ष –  6.75 टक्के
  • 3 ते 5 वर्षे आणि 5 ते 10 वर्षे – 6.25 टक्के

ज्येष्ठांना जादा व्याजदर

Advertisement

ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेट बँक सर्व कालावधीच्या मुदत ठेवींवर उपलब्ध व्याजदरांना अतिरिक्त 50 आधार गुण देणार आहे. त्यामुळे नव्या नियमानुसार, आता ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 3.5 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर मिळणार आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement