SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): व्यापार्‍यांना नवीन दिशा सापडेल. मनातील साशंकता काढून टाका. प्रगतीच्या दृष्टीने नवीन पाऊल उचलले जाईल. बोलताना संभ्रमीत होऊ नका. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. कामात अनुकूल परिस्थिती राहिल. खर्च वाढेल त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. शारीरिक रूपातून मन आनंदीत राहिल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. मनाला शांती लाभेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळाल्याने आर्थिक समस्या दूर होईल.

वृषभ (Taurus): अनेक दिवस भिजत पडलेले प्रश्न मार्गी लागतील. हातातील वेळेचा सदुपयोग करा. व्यापारी वर्गाला नवीन करार लाभदायक ठरतील. रोजगाराची नवीन संधी प्राप्त होईल. कार्यालयीन ठिकाणी मतभेद टाळावेत. मानसिक संतुलनात स्थिरता राहील. प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल. धन लाभ होईल. शुभवार्ता मिळेल. धावपळीच्या जीवनात मान-सन्मान मिळेल. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल. तुमच्या सल्ल्याचे पालन करणारी व्यक्ती अभ्यासाच्या क्षेत्रात चांगले परिणाम देईल.

मिथुन (Gemini) : काटकसरीवर लक्ष द्या. हातातील कलेला वेळ द्यावा. घरात लोकांची उठ बस राहील. वडीलधार्‍यांचे मत ग्राह्य मानावे लागेल. कार्यालयीन सहकार्‍यांची मदत मोलाची ठरेल. जुना काळ विसरून पुढे गेल्यास फायदा होईल. कोणतेही मतभेद त्वरीत सोडवण्याचा प्रयत्न करा. महिला दिवसभर कौटुंबिक कार्यात व्यस्त राहतील. नशिबाच्या जोरावर तुम्ही कोणतेही मोठे यश मिळवू शकता. संपत्ती आणि यश यांचा उत्तम मेळ साधला जात आहे.

कर्क (Cancer) : मुलांशी वाद संभवतात. जोडीदाराची इच्छा प्रमाण मानाल. हातातील चांगली संधी सोडू नका. भागीदारीत फार विसंबून राहू नका. उगाचच चीड -चीड करू नये. जीवनात अपयश येईल आणि अधिक खर्च देखील वाढेल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. भाऊ-बहिणीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या चांगल्या ठिकाणी प्रवासाचे नियोजन करू शकता. तुमचा कामाचा बोजा एखाद्यासोबत शेअर केल्याने तुम्हाला थोडा आराम वाटेल.सिंह (Leo) : घरातील कामात व्यस्त राहाल. जमिनीची कामे सुरळीत पार पडतील. संपूर्ण दिवस धामधुमीत जाईल. कामाची अतिरिक्त जबाबदारी अंगावर पडू शकते. कष्टाला पर्याय नाही. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. व्यापार्‍यांसाठी दिवस लाभदायक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीने सहकारी प्रभावित होतील. कष्टाने केलेली कामेही पूर्ण होतील. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ किंवा कुठूनतरी बक्षीस मिळू शकते.

कन्या (Virgo) : आपल्या चाणाक्ष बुद्धीची चुणूक दाखवाल. विद्यार्थ्यानी केवळ अभ्यासावर लक्ष केन्द्रित करावे. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत उपलब्ध होतील. बौद्धिक कौशल्य दाखवावे लागेल. आज आपले विचार आणि वर्तन नियमित ठेवावे. दागिने आणि पौष्टिक पदार्थांची खरेदी होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग केल्याने प्रगतीच्या संधी मिळतील. तुमच्यासमोर काही अडचणी येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.

तुळ (Libra) : जुने ग्रंथ वाचनात येतील. आध्यात्मिक क्षेत्रात तल्लीन होऊन जाल. तरुण वर्गाच्या सहवासात रमाल. महत्त्वाची कामे तूर्तास टाळावीत. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. तुमच्या हातातून मोठे काम होईल.चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आजचा दिवस शुभ राहील. तुमची प्रतिमा मजबूत होईल. संपर्क आणि संबंधांद्वारे यश प्राप्त करण्यास सक्षम व्हाल. तुमच्या मालमत्तेची कोणतीही माहिती गोपनीय ठेवणे अधिक महत्त्वाचे ठरेल.

वृश्‍चिक (Scorpio) : मानसिक अस्वस्थतेत वाढ होऊ शकते. स्वत:साठी काही वेळ काढावा. सकारात्मक गोष्टी आठवून पहा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरीच्या ठिकाणी नव्या जबाबदार्‍या मिळतील. आयुष्याच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कामी येतील. धर्मकार्यात मन रमेल. रोजगारासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात विचार करून गुंतवणूक करा तरच लाभ मिळेल.

Advertisement


धनु (Sagittarius) : तुमच्या मताला मान मिळेल. पत्नीच्या सहकार्याने कामे कराल. मदतीचा आनंद मिळवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घराबाहेर वावरतांना काळजी घ्यावी. मित्रांसोबत चांगला दिवस जाईल. नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल. अविवाहित तरुण तरुणींसाठी योग्य जोडीदार मिळेल. विनाकारण धावपळ होईल.

मकर (Capricorn) : एकांतात काही काळ घालवावा. काही गोष्टींचे मनन चिंतन करावे. मित्रांचे योग्य वेळी सहकार्य लाभेल. भागीदारीतून लाभ शक्य होईल. झोपेची तक्रार जाणवेल. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. उत्पन्न स्थिर राहील. एखाद्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने अपेक्षाभंग होईल. आज आनंदाचे वातावरण असेल. लोखंड आणि धातूचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. नातेवाईकांकडून धनाची मदत मिळेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात काही बदल करू शकता.

कुंभ (Aquarious) : घरातील वातावरण उत्साही ठेवा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडा. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल. भागीदाराशी मतभेद संभवतात. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळेल, अधिकार वाढतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास सफल होईल. दिवसभर कुठलीतरी चिंता जाणवले. आर्थिक प्रगतीसाठी संधी मिळतील. चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

मीन (Pisces) : बोलण्यात संभ्रम येऊ देऊ नका. कौटुंबिक सौख्य जपावे. आपल्या अधिकाराची जाणीव ठेवा. व्यापारी वर्गाने संधी सोडू नये. कुटुंबातील सदस्यांबरोबर विचार विनिमय करावा. व्यवहार करताना काळजी घ्या. रोजगार मिळण्याची संधी, मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल. स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामात जास्त रस घ्या. कामाच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागू नका. ऑफिसच्या कामावर तुमची पकड कायम ठेवावी लागेल.

Advertisement