SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सेकंड हँड बाईकवर जबरदस्त ऑफर, बजेट हवं फक्त ‘एवढंच…’

देशात टू व्हीलर मार्केटचा विचार केला तर ते दरवर्षी वाढत असून लाखो युनिट्सची अनेक बाईक बनविणाऱ्या कंपन्या विक्री करत असतात. पण सध्याच्या महागाईनुसार नवीन बाईक ग्राहकांना 80 हजार रुपयांच्या आसपास खरेदी करावी लागू शकते. पण अनेकांचे बजेट कमी असल्याने सेकंड हॅन्ड बाईकचा पर्याय लोक निवडतात.

🤩 जर तुम्हालाही 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये चांगली बाईक हवी असेल तर तुमच्यासाठी हिरो मोटोकॉर्पची सुपर स्प्लेंडर बाईक जी जवळपास 79 हजार रुपये ते 83 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन येते तिच्यावर खास ऑफर आहे. ही सेकंड हँड बाईक तुम्हाला हवी असेल तर तुम्ही 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. इंजिन आणि मायलेजसाठी ही बाईक ग्राहकांची पसंती आहे.

Advertisement

▪️ OLX: सेकंड हँड हिरो सुपर स्प्लेंडरची आजची पहिली आणि दमदार डील ओएलएक्स वेबसाईटवर उपलब्ध आहे. हिरो सुपर स्प्लेंडरचे 2012 चे हे मॉडेल आहे. या बाईकची नोंदणी दिल्ली येथील असून बाईकची किंमत 15 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. बाईक खरेदी करताना एकदाच पूर्ण पैसे देऊन तुम्ही खरेदी करू शकता.

▪️ DROOM: दुसरी ऑफर ड्रुम वेबसाइटवरून घेतली आहे. या बाईकचे येथे 2014 चे मॉडेल असून किंमत 20 हजार रुपये आहे. बाईकची नोंदणी दिल्लीची आहे आणि या बाईकसोबत फायनान्स प्लॅनही उपलब्ध असेल. म्हणजेच हप्त्यावर तुम्ही ही बाईक घेऊ शकता.

Advertisement

▪️ QUIKR: आणखी एक जबरदस्त ऑफर या वेबसाईटवर असून येथे दिल्ली नंबर प्लेटसह सुपर स्प्लेंडरची 2015 च्या मॉडेलची किंमत 25000 रुपये आहे. या बाईकसोबत कोणतीही इतर ऑफर दिली जाणार नाही व ही रक्कम एकदाच भरून तुम्ही बाईक खरेदी करू शकता.

(बाईक खरेदी करताना एकदा कागदपत्रे तपासून पाहा व चौकशी नक्की करा.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement