SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. आपल्याजवळील आनंद लक्षात घ्यावा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मनोबल वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. विचारपूर्वक वागा. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह वेळ घालवा. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरु करणे टाळा, गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या.

वृषभ (Taurus): ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. मनातील चलबिचलता काढून टाकावी. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे. दिनक्रम व्यस्त राहील. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कौटुंबिक जिवन समाधानी असेल. मुलांचे हट्ट आनंदाने पुरवाल.

Advertisement

मिथुन (Gemini) : निष्कारण वाद नको. मनातील गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. घरगुती जबाबदारीत वाढ होईल. कामाचा ताण जाणवेल. घाईने निर्णय घेऊ नयेत. आज तुम्हाला डोकं शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल. नवीन व्यावसायिक भागीदारीत काही सुरु करणे टाळा.

कर्क (Cancer) : समोरच्याचे मत खोडून काढाल. ठाम भूमिका घ्याल. हातातील अधिकाराचा वापर कराल. अचानक धनलाभ होईल. अति काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका. आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. गरज पडल्यास आपल्या जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. झोपेची तक्रार जाणवेल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. घराबाहेर सावधानतेने वावरावे.

Advertisement

सिंह (Leo) : निर्णय ऐनवेळी बदलावे लागू शकतात. डोळ्याचे विकार संभवतात. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवस गप्पा व मौजमजेत जाईल. आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. आज प्रेमप्रकरणे मात्र डोक्यास ताप देतील. अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे.

Advertisement

कन्या (Virgo) : मनावर कोणताही दबाव न आणता वागावे. निर्णयाची कारणमीमांसा कराल. आपल्या मतावर अडून राहाल. धार्मिक गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालावे. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. खाण्यावर नियंत्रण ठेवा. तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. परंतु त्या विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.

तुळ (Libra) : जिद्द सोडून चालणार नाही. परिस्थितीशी जमवून घ्यावे लागेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कौटुंबिक कामात अधिक वेळ जाईल. समोरील गोष्टींकडे सकारात्मकतेने पहावे. आज कंबरदुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

Advertisement

वृश्‍चिक (Scorpio) : आवडी-निवडी बाबत आग्रही राहाल. फार चिडचिड करू नका. कौटुंबिक वातावरण खेळकर ठेवावे. मानसिक शांतता लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात.

Advertisement

धनु (Sagittarius) : कार्यक्षेत्रात एखादे परिवर्तन घडून येईल. संवेदनशीलता ठेवावी लागेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. पोटाची तक्रार जाणवू शकेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल. मित्रांची उत्तम साथ लाभेल. कलाकार मंडळींना वेगळा दर्जा मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील.

मकर (Capricorn) : व्यावसायिक स्तरावर अनुकूल घटना घडतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रापंचिक ताण कमी होईल. प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : दिवस आनंदात जाईल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी कराल. परस्पर संवादातून सुखद बदल होतील. विरोधक नरम भूमिका घेतील. कलेतील नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आजचा दिवस उत्साहात जाईल. मित्र परिवारासह बाहेर जाण्यास वेळ काढा. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल. अतिविचार करू नका. नवे मनसुबे यश देतील. बोलण्यातून आत्मविश्वास प्रकट कराल. आपल्या मताबद्दल आग्रही राहाल.

मीन (Pisces) : मनातील स्वप्न साकार होईल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. मुलांबाबतच्या जबाबदार्‍या पार पाडाल. राजकीय व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा. प्रगतीसाठी नवीन मार्ग आणि पर्याय शोधणे आवश्यक आहे, तुम्हाला यश मिळेल. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस अधिक फायदेशीर आहे. जास्त खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

Advertisement