ज्येष्ठ अभिनेते, नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 93व्या वर्षी मुंबई येथील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली.
कोणत्या चित्रपटांत व नाटकांत केलं काम?
▪️ ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांनी कैवारी, निवडुंग, पोरका, थोरली जाऊ, जन्मदाता, वाट पाहते पुनवेची, जावई माझा भला, प्रेमांकुर अशा बऱ्याच गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय.
▪️ मराठी चित्रपटसृष्टीसोबतच ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांनी ‘लेकुरे उदंड झाली’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’,’नटसम्राट’, ‘मत्स्यगंधा’, अखेरचा सवाल, दुर्गा, स्पर्श, आभाळाचे रंगयांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली.
मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1930 रोजी झाला. वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टर होते. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली आणि त्यांच्या आईही स्वतंत्र विचारांच्या होत्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in