SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सेकंड हँड बाईक खरेदी करायचीय? ‘येथे’ मिळतेय अगदी स्वस्त..

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे अनेक जण सेकंड हॅन्ड बाईकच्या शोधात असतात. जर तुम्हाला सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बेस्ट डील काही वेबसाईटवर उपलब्ध आहे. यावर तुम्हाला बजेटनुसार बाईक खरेदी करता येऊ शकते.

तुम्हाला चांगल्या मायलेजची बाईक खरेदी करायची असेल तर Hero HF Deluxe ही सेकंड हँड बाईक तुम्हाला परवडू शकते. जी अंदाजे 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला विकत घेता येईल. या किंमतीत कमी-अधिक बदल देखील होऊ शकतो. सेकंड हँड वाहनांची विक्री आणि खरेदी करणार्‍या वेगवेगळ्या वेबसाइट्सवरून घेतल्याने बाईकची कागदपत्रे व इतर काही समस्या पुढे येत नाही.

Advertisement

▪️ हिरो एचएफ डिलक्स ही बाईक जर तुम्ही सेकंड हँड खरेदी करायचं ठरवलं तर दिल्ली पासिंगचे 2015 चे मॉडेल DROOM वेबसाइटवर उपलब्ध आहे. तर ही बाईक तुम्हाला येथे 22 हजार रुपयांच्या जवळपास खरेदी करता येऊ शकते. जर हप्त्यावर घ्यायची असेल तर तुम्हाला फायनान्स प्लॅनची ​​सुविधाही मिळेल.

▪️ हिरो एचएफ डिलक्स खरेदी करण्यासाठी दुसरा पर्याय तोही अगदी स्वस्तात OLX या वेबसाईटवर असून 2016 चे मॉडेल येथे लिस्ट झाले आहे. किंमतीबद्दल सांगायचं झालं तर हे मॉडेल तुम्हाला 24,500 रुपयांच्या जवळपास खरेदी करता येणार आहे. या बाईकचा नंबर दिल्लीचा असून या बाईकवर फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

Advertisement

▪️ हिरो एचएफ डिलक्सची आणखी एक बाईक ऑफर QUIKR वेबसाइटवर मिळत असून येथे ही बाईक 26,000 रुपयांना मिळणार असून दिल्ली पासिंग असणारी ही बाईक 2017 ची आहे. हप्त्यावर खरेदी करण्यासाठी या बाईकवर कोणताही फायनान्स प्लॅन मिळणार नाही.

(टीप- कोणतीही सेकंड हँड बाईक खरेदी करताना कागदपत्रे नीट तपासून पाहा. व्यवहारात फसवणूक होण्यापूर्वी सावधानता नक्की बाळगा.)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement