SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

3 डिसेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️  देशात सर्वाधिक बेरोजगारी दर 30.6% हरियाणा राज्यात, महाराष्ट्रातील बेरोजगारी दर 3.5 टक्के; नोव्हेंबरमध्ये देशातील बेरोजगारी दर 8% वर 

✒️  राज्य सरकार शहरी भागातील मध्यवर्ती ठिकाणी एसटी महामंडळाच्या जागांवर पोलीस वसाहत उभारणार, गृहविभागाने मागितली मोकळ्या जागांची माहिती

Advertisement

✒️ राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्यात येणार, कोणतेही सरकारी काम ऑनलाईन करता येणार

✒️ महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांची मंजुरी, राज्याच्या गृहनिर्माण क्षेत्रासह मुंबईकरांना मोठा दिलासा 

Advertisement

✒️ राज्यातील गड व किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना, महाराष्ट्र शाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम निश्चितीसाठी सल्लागार समितीचे गठन

✒️ भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘डुइंग बिझनेस’ मूल्यांकनात महाराष्ट्र अव्वल; यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केलेल्या नोव्हेंबर 2022 च्या अहवालात केलं नमूद

Advertisement

✒️  मारुती सुझुकी जानेवारी 2023 पासून कारच्या किंमती वाढवणार, हॅचबॅक स्विफ्ट व विविध इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे सर्व सीएनजी प्रकारांच्या किंमतींमध्ये बदल करण्याची घोषणा

✒️  बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार तमिम इक्बाल सरावादरम्यान दुखापतग्रस्त, आता भारतासोबत होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांसाठी लिटन दास कर्णधार

Advertisement

✒️  ईडीने छत्तीसगडमध्ये कोळसा घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली सुरु, मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्या उपसचिव सौम्या चौरसिया यांना कोळसा खंडणी प्रकरणात अटक

✒️  दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘गोलमाल’ चित्रपटाचा पुढील भाग आणणार, अभिनेता रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत झळकणार

Advertisement