मागील काही दिवसांपासून राज्यात आलेली थंडीची लाट आठवडयापूर्वी अनेक भागांत अचानक ओसरली आणि आता दोन ते तीन दिवसांपासून हळूहळू पुन्हा थंडी वाढत आहे. राज्याच्या अनेक भागात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार चालूच आहे. यामुळे निफाड आणि धुळे येथे पारा पुन्हा 10 अंशाखाली आला आहे.
देशातील सपाट भूभागावरील सर्वांत निचांकी तापमान शुक्रवारी (ता. 2 डिसेंबर) राजस्थानमध्ये होते, ते चूरू भागात 5 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले होते. उत्तरेकडील राज्यांमध्ये आता गारठा वाढू लागल्याने आज दिनांक 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात कोरडे हवामान आणि तापमानात म्हणजेच तापमानात चढ-उतार राहू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील 24 तासांपूर्वी राज्यातील काही शहरांतील तापमान जाणून घ्या..
शहर – कमाल तापमान (किमान तापमान ℃ मध्ये):
▪️ औरंगाबाद – 29.4 (10.8)
▪️ पुणे – 29.7 (11.1)
▪️ जळगाव – 30.8 (11.4)
▪️ धुळे – 30.0 (9.4)
▪️ महाबळेश्वर – 26.8 (14.9)
▪️ नाशिक – 28.7 (12.0)
▪️ निफाड – 28.6 (9.5)
▪️ परभणी – 30.0 (13.8)
▪️ अकोला – 30.7 (13.5)
▪️ अमरावती – 30.2 (13.5)
▪️ बुलढाणा – 29.3 (13.8)
▪️ गडचिरोली – 32.2 (13.6)
▪️ गोंदिया – 28.3 (13.0 ),
▪️ नागपूर – 29.6 (13.3)
▪️ वर्धा – 29.0 (14.0)
▪️ यवतमाळ – 30.0 (13.0)
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in