SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वस्तात मिळतोय 5G स्मार्टफोन, वाचा किंमत आणि जबरदस्त फीचर्स..

इन्फिनिक्स स्मार्टफोन्स निर्माता कंपनीने आपले दोन नवीन 5G स्मार्टफोन ग्राहकांना अगदी स्वस्त खरेदी करता येतील अशा किंमतीत आणले आहेत. Infinix Hot 20 Play आणि Infinix Hot 20 5G असे हे दोन स्मार्टफोन्स कंपनीने लॉंच केले आहेत. हॉट 20 5जी या स्मार्टफोनच्या प्रायमरी कॅमेऱ्यामध्ये ड्युअल एलईडी फ्लॅश आणि हॉट 20 प्लेच्या प्रायमरी कॅमेऱ्यामध्ये क्वाड एलईडी फ्लॅश दिला आहे.

💰 किंमत: इन्फिनिक्स हॉट 20 प्ले आणि हॉट 20 5G यांची किंमत अनुक्रमे 8 हजार 999 रुपये आणि 11 हजार 999 रुपये आहे.

Advertisement

🤓 स्मार्टफोन्समध्ये आणखी काय खास?

दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 4जी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल मेमरी असेल. हॉट 20 प्ले लुना ब्ल्यू, ऑरोरा ग्रीन, रेसिंग ब्लॅक या तीन कलरमध्ये लॉंच झाला आहे. तर हॉट 20 5जी हा स्पेस ब्ल्यू, ब्लास्टर ग्रीन, रेसिंग ब्लॅक या तीन कलर्समध्ये सादर झाला आहे.

Advertisement

▪️ Infinix Hot 20 Play मध्ये 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 120 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट 6.82 इंच एचडी प्लस होल फ्लुइड गेमिंग डिस्प्ले मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये 6000 एमएएच बॅटरी असणार आहे.

▪️ याशिवाय या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. हॉट 20 प्लेमध्ये ऑक्टा कोअर जी 37 गेमिंग प्रोसेसर मिळू शकतो.

Advertisement

▪️ इन्फिनिक्स हॉट 20 5G मध्ये 120 हर्ट्झ अल्ट्रा हाय रिफ्रेश रेट व 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट दिला आहे. 6.58 इंच एफएचडी + हायपर व्हिजन गेमिंग डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी असणार आहे.

▪️हॉट 20 5जी स्मार्टफोनमध्ये 6 एनएम डायमेन्सिटी 810 प्रोसेसर मिळत आहे. Infinix Hot 20 5G स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement