SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

29 नोव्हेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ विमानतळांच्या धावपट्ट्यांच्या विस्तारीकरणासह राज्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड तयार करा, वैद्यकीय मदतीसाठी हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो – मुख्यमंत्री

✒️ महिंद्रा अँड महिंद्रा जानेवारी 2023 मध्ये XUV 400 इलेक्ट्रिक कार लॉंच करण्याची शक्यता, एका चार्जमध्ये या कारने 456 किलोमीटरचा प्रवास करता येणार

Advertisement

✒️ कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल अवकाळी पावसाने लावली हजेरी, काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी झाला मुसळधार पाऊस

✒️ दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने जैश-ए-मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा, 2019 मध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करून कट रचल्याप्रकरणी शिक्षा

Advertisement

✒️ ट्विटर शब्दमर्यादा वाढवणार, लवकरच यूजर 420 शब्दांमध्ये ट्विट करू शकणार; मस्क यांनी ट्विटरवर एका यूजरच्या प्रश्नाला दिले उत्तर

✒️ नाशिक येथील अनाथ आश्रमातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करा, 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे महिला व बालविकास मंत्री एमपी लोढा यांचे निर्देश

Advertisement

✒️ महाराष्ट्रातील अमर सातपुते, रजनी शिर्के, अभय पंडित या तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते सन्मान

✒️ जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सचे नाव बदलून mpox केले, व्हायरसच्या नावाबाबत अनेक तक्रारी आल्याचे संस्थेचे म्हणणे

Advertisement

✒️ नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकींना भीषण आग, आगीत पार्किंगमधील तब्बल 42 गाड्या जळून झाल्या खाक

✒️ सोनाली कुलकर्णीच्या 16 डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ‘व्हिक्टोरिया’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज; सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि आशय कुलकर्णी भूमिकेत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement