स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून चार मुख्य परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 पुढे ढकलल्याचे ‘एमपीएससी’तर्फे जाहीर करण्यात आले आहे.
पीएसआय, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदासाठी या परीक्षा होणार होत्या. मात्र, आता त्या पुढे ढकलण्यात आल्या असून, या सर्व परीक्षांच्या नवीन तारखा स्वतंत्रपणे लवकरच जाहीर करण्यात येतील, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. pic.twitter.com/lPwabrzrQy
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) November 28, 2022
Advertisement
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 हा 24 डिसेंबर 2022 रोजी होणार होता. तसेच, पोलिस उपनिरीक्षक पदासाठी 31 डिसेंबर 2022 रोजी पेपर क्रमांक 2 हाेणार होता. 7 जानेवारी 2023 रोजी राज्य कर निरीक्षक पदासाठीचा पेपर क्रमांक 2, तसेच 14 जानेवारी 2023 रोजी होणारी पेपर क्रमांक 2 सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पुढे ढकलली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली आहे, तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर एक प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार असल्याची माहिती लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली.