अॅमेझॉन या ई-काॅमर्स वेबसाईटवर आयफोन-12 वर धमाकेदार ऑफर सुरु आहे. ग्राहकांना तब्बल 60 हजार रुपयांच्या ‘आयफोन -12’ वर चक्क 25,701 रुपयांची सूट मिळत असून, फक्त 34,199 रुपयांत खरेदी करता येणार आहे.
आयफोन-12 वरील ऑफर्स
आयफोन-12 च्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 59.900 रुपये आहे. अॅमेझॉनवर या फोनवर 26 टक्के (10,901 रुपये) सवलत दिली आहे. शिवाय, बँक व एक्सचेंज ऑफरद्वारे आयफोनची किंमत आणखी कमी होईल.
एक्सचेंज बोनसमध्ये तुमच्या जुन्या फोनवर 13,300 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. अर्थात, एक्सचेंज बोनसची रक्कम तुमच्या जुन्या फोनच्या स्थिती, माॅडेल व ब्रॅंडवर अवलंबून असेल.
तसेच, बँक ऑफरचाही लाभ घेता येईल. बँक ऑफ बडोदाचे क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. बँक व एक्सचेंज ऑफरमुळे आयफोन-12 फक्त 34,199 रुपयांत खरेदी करता येईल.