SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘होंडा अ‍ॅक्टिव्हा’चे 7G माॅडेल लाॅंच होणार? स्कूटरमध्ये असणार ‘ही’ भन्नाट फिचर्स…!!

भारतीयांची सर्वात आवडती स्कूटर म्हणजे, होंडा अ‍ॅक्टिव्हा.. देशात ही सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. गेल्या महिन्यातच या स्कूटरच्या तब्बल 2,10,623 युनिट्सची विक्री झाली होती. या आकडेवरूनच होंडा अ‍ॅक्टिव्हा भारतीय ग्राहकांमध्ये किती लोकप्रिय आहे, याचा अंदाज येतो. विश्वासार्हता, मायलेज नि कमी मेन्टेनन्स खर्च, यामुळे ही स्कूटर ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन होंडा कंपनी आपली ही स्कूटर सतत अपडेट करीत असते. त्यामुळेच या स्कूटरची लोकप्रियता कायम राखली गेली आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हाचे सध्या 6G (सहावे जनरेशन) सुरु आहे. कंपनी दर दोन वर्षांनी नवीन जनरेशनची अ‍ॅक्टिव्हा लॉन्च करते. त्यानुसार, कंपनी लवकरच अ‍ॅक्टिव्हा 7G लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

अ‍ॅक्टिव्हा 7G ची वैशिष्ट्ये

होंडा कंपनीकडून अ‍ॅक्टिव्हा 7G ची फिचर्स समोर आली नसली, तरी कंपनीने आतापर्यंत नवीन जनरेशनचे माॅडेल सादर करताना, गाडीच्या डिझाइनमध्ये फार बदल केलेले नाहीत. मात्र, अ‍ॅक्टिव्हा 7G स्कूटरमध्ये 109 सीसीचे हायब्रिड इंजिन असू शकते, ज्यात बॅटरीतून पॉवर मिळेल. सध्या यामाहा कंपनीच्या फॅसिनो व रे-ZR स्कूटरमध्ये असे इंजिन आहे.

Advertisement

अ‍ॅक्टिव्हा 7G स्कूटरमध्ये स्टार्ट व स्टॉप तंत्रज्ञान, स्मार्ट पॉवर जनरेटर असू शकते. त्यामुळे स्कूटरची कार्यक्षमता सुधारेल, मायलेज वाढेल. मोठे व्हील्स असू शकतात. अ‍ॅक्टिव्हा 6G स्कूटरमध्ये अ‍ॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. मात्र, नव्या माॅडेलमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, हायब्रिड स्विच आदी फीचर्स मिळतील.

भारतात अ‍ॅक्टिव्हा 7G स्कूटर कधी लॉन्च होणार, नेमके कोणते फीचर्स असणार नि महत्वाचे म्हणजे स्कूटरची किंमत किती असू शकेल, याबाबत कोणतीही माहिती कंपनीने दिलेली नाही. ग्राहकांना नव्या माॅडेलची उत्सुकता लागली आहे.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement