एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून अनेक फेरबदल केले आहेत. सर्वात आधी मोठ्या प्रमाणात नोकर कपात करण्यात आली. त्यानंतर ब्ल्यू टिक सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली. मस्क यांनी आणखी एक बदल केला आहे.
ट्विटर व्हेरिफाईड तीन रंगात
आता ट्विटर अकाऊंट तीन रंगात व्हेरिफाईड होणार आहे. टिक व्हेरिफाईडसाठी आता निळा, सोनेरी, राखाडी रंगाचा चेक मार्क येणार आहे. येत्या 2 डिसेंबरपासून हा बदल केला जाणार असल्याचे मस्क यांनी सांगितले आहे.
खासगी कंपन्यांसाठी सोनेरी चेक मार्क, सरकारसाठी राखाडी चेक मार्क, तर व्यक्तींसाठी (सेलिब्रेटी किंवा सामान्य) निळा चेक मार्क जारी केला जाईल. चेक मार्क सक्रिय होण्यापूर्वी सर्व सत्यापित खाती मॅन्युअली प्रमाणीकृत केली जातील.
नवीन बदलांसह ट्विटर ब्लू सेवा पुन्हा लाँच केली जाणार आहे. येत्या 2 डिसेंबरपासून ट्विटर ब्लू टिकसाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवा पुन्हा लाँच करणार आहेत. मात्र, अन्य रंगांसाठी शुल्क रचना स्पष्ट केलेली नाही.