जगात अशा कित्येक कंपन्या आहेत ज्या कोटी-कोटी रुपये एका दिवसात कमवतात त्यापैकी काही कंपन्या तर आपल्याला माहीतच असतील. आता आज आम्ही तुम्हाला अशा काही कंपन्यांची नावे सांगणार आहोत ज्या दर सेकंदाला मोठे पैसे कमावतात. अॅपल आणि गुगल सारख्या कंपन्यांचा या यादीत समावेश होतो.
आयफोन बनवणारी अॅपल कंपनी प्रत्येक सेकंदास तब्बल 1820 डॉलर म्हणजेच जवजवळ 1.48 लाख रुपयांहून जास्त पैशांची कमाई करत आहेत. आता आपल्याला माहीत करून घेण्याची भूक आणखी वाढेल. तर ऐका, अॅपल कंपनी एका दिवसात 157 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांत सांगायचं झालं तर अंदाजे 1282 कोटी रुपये कमावत असल्याची माहीती आहे.
आता या शर्यतीत गुगल आणि मायक्रोसॉफ्ट देखील मागे नाहीत बरं का! कारण या कंपन्या दररोज 100 मिलियन डॉलर्सहून अधिकची कमाई करत आहेत. मायक्रोसॉफ्टची दर सेकंदाला 1404 डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांत 1.14 लाख रुपये तर वॉरेन बफे यांची बर्कशायर हॅथवे कंपनीची दर सेकंदाची कमाई 1348 डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयांत 1.10 लाख रुपये आहे.
गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट दर सेकंदाला 1277 डॉलर्स म्हणजेच जवळपास 1 लाख 4 हजार रुपये आणि मेटा कंपनी 924 डॉलर्स म्हणजेच 75,400 रुपयांच्या जवळपास कमावत आहे. म्हणजेच कमाईच्या आकड्यांमध्ये अॅपल सर्वाधिक कमाई करणारी कंपनी असल्याचं दिसत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in