SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता ट्रेनचे तिकीट कन्फर्म न झाल्यास मिळणार विमानाचे तिकीट, वाचा फायद्याची बातमी..

तुम्हाला जर ट्रेनने प्रवास करायचा असेल आणि जर तुमचं तिकीट वेटिंगवर असेल आणि तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म झाले नाही, तर तुमच्यासाठी फायद्याची बातमी असणार आहे. कारण जर असं घडलं तर तुम्हाला त्याऐवजी विमान प्रवासाचे तिकीट मिळणार आहे. हे शक्य होणार आहे ‘ट्रेनमॅन’ नावाच्या ट्रेन बुकिंग ॲपने!

ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाले नसल्यास प्रवाशांना विमानाचं तिकीट मिळणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रवाशांसाठी फक्त एक अट असणार आहे ती म्हणजे प्रवाशांना ट्रेनमॅन ॲपद्वारे ट्रेनचे तिकीट बुक करावे लागणार असून त्याअंतर्गत 1 रुपयात ‘ट्रिप ॲशुरन्स प्लॅन’ घ्यावा लागणार आहे.

Advertisement

ट्रेनमॅन ॲप आणि ट्रिप ॲशुरन्स फिचरबद्दल:

▪️ ट्रेनमॅन ॲपने एक खास फिचर लॉंच केले आहे ज्याचं नाव ‘ट्रिप ॲशुरन्स प्लॅन’ आहे. या फिचर अंतर्गत ट्रेनचे तिकीट बुक करताना ट्रेनचे तिकीट कन्फर्म होण्याचे चान्सेस कमी असतील तर प्रवाशांना फक्त 1 रुपया शुल्क भरून या फिचरचा लाभ मिळेल.

Advertisement

▪️ आता जर समजा प्रवाशांचे ट्रेनचे तिकीट कन्फर्म होण्याचे 90% पेक्षा जास्त चान्सेस असतील आणि ट्रेनचे तिकीट कन्फर्म झालेच तर तुम्ही भरलेले हे शुल्क तुम्हाला परत मिळेल.

▪️ पण जर ट्रेनचे तिकीट कन्फर्म न झाल्यास आणि ट्रेनचे तिकीट कन्फर्म होण्याचे 90% पेक्षा कमी चान्सेस असतील तर तर ते विमानाच्या तिकिटात कन्व्हर्ट केले जाईल. फक्त हे शुल्क तिकीट व क्लासच्या आधारावर बदलू देखील शकते.

Advertisement

▪️ महत्वाचं म्हणजे ही ऑफर ज्या ठिकाणी एअरपोर्ट असेल, अशाच ठिकाणी लागू असणार आहे. जिथे एअरपोर्ट नसेल तिथे या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. तसेच ट्रिप अ‍ॅश्युरन्सचे हे वैशिष्ट्य सध्या भारतात सर्व आयआरसीटीसी राजधानी ट्रेन आणि सुमारे 130 इतर ट्रेनसाठी उपलब्ध आहे. ट्रेनमॅन ॲपच्या या फिचरमध्ये बदलदेखील होऊ शकतो, यामुळे प्रवाशांनी एकदा खात्री करून घ्यावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement