SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

1 डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम, सर्वसामान्यांच्या खिशावरील भार वाढणार..?

प्रत्येक महिना सुरु होताना, काही ना काही नवीन बदल होतात. 2022 मधील अखेरचा डिसेंबर महिना सुरु होण्यास अवघे 3 दिवस राहिले आहेत. या महिन्यातही विविध क्षेत्रात काही बदल होणार असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम होणार आहे. हे बदल नेमके काय असतील याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

1 डिसेंबरपासून काय बदलणार..?

Advertisement

गॅस सिलिंडरचे दर

दर महिन्याच्या 1 तारखेला भारतीय तेल कंपन्या गॅस सिलिंडरचे दर जाहीर करतात. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर कायम होते. 1 डिसेंबरपासून एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे. शिवाय सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतो.

Advertisement

एटीएममधून पैसे काढणे

एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत बदलू शकते. सध्या एटीएममधून पैसे काढताना अनेक वेळा फसवणूक होत असते. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेने डिसेंबर महिन्यात एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधूनही पैसे काढणे बदलणार आहे. आता एटीएममध्ये कार्ड टाकताच, तुमच्या मोबाइलवर ओटीपी जनरेट होईल. एटीएम स्क्रीनवर दिलेल्या कॉलममध्ये हा ओटीपी टाकल्यानंतरच रोख रक्कम दिली जाईल.

रेल्वेच्या वेळापत्रकात सुधारणा

Advertisement

हिवाळ्यात धुक्यामुळे रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. थंडीमुळे डिसेंबर महिन्यात रेल्वेच्या वेळापत्रकात सुधारणा होऊ शकते. नव्या वेळापत्रकानुसार रेल्वे गाड्या चालवल्या जाऊ शकतात.

पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र

Advertisement

पेन्शनधारकांना लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास, 1 डिसेंबरपासून पेन्शन थांबू शकते.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement