भारतात सोने आणि चांदीचे दागिने यांना विशेष महत्व आहे. जर तुम्हाला सोने-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करायची असेल तर मग दररोज बदलणारे दर तुम्हाला माहीत हवेत. आज (26नोव्हें.) सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही पण चांदी मात्र 200 रुपयांनी स्वस्त होऊन 61,800 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 48,550 रुपये तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 52,970 रुपये आहेत. ऐन लग्नसराईत दागिने महाग होत आहेत तरी त्यांची किंमत आणखी वाढण्यापूर्वी खरेदी लवकर करणं फायद्याचं ठरू शकतं. प्रत्येक शहरात सोने आणि चांदीचे दर वेगळे असतात म्हणून तुमच्या शहरात दर तपासताना किंचित फरक जाणवू शकतो.
काही मोठ्या शहरांतील सोन्याचे आजचे दर:
22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 49,250 रुपये
▪️ मुंबई – 48,550 रुपये
▪️ दिल्ली – 48,700 रुपये
▪️ कोलकाता – 48,550 रुपये
▪️ बंगळुरू – 48,600 रुपये
▪️ हैदराबाद – 48,550 रुपये
▪️ लखनऊ – 48,700 रुपये
▪️ पुणे – 48,550 रुपये
▪️ नागपूर – 48,550 रुपये
▪️ नाशिक – 48,550 रुपये
24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर:
▪️ चेन्नई – 53,730 रुपये
▪️ मुंबई – 52,970 रुपये
▪️ दिल्ली – 53,120 रुपये
▪️ कोलकाता – 52,970 रुपये
▪️ बंगळुरू – 53,020 रुपये
▪️ हैदराबाद – 52,970 रुपये
▪️ लखनऊ – 53,120 रुपये
▪️ पुणे – 52,970 रुपये
▪️ नागपूर – 52,970 रुपये
▪️ नाशिक – 52,970 रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in