SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries) : एखादे काम अर्धवट सोडू नका. स्वकर्मावर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी गाफिल राहू नका. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला आदर मिळेल. नव्या काँट्रॅक्ट्सच्या माध्यमातून पद आणि प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. ज्या लोकांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी स्वतःची योग्य काळजी घ्यावी. घरामध्ये कोणाहीसोबत वाद घालू नका.

वृषभ (Taurus) : कोणत्याही सल्ल्यावर विसंबून राहू नका. नवीन काम सुरू करताना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. समोरच्यावर विश्वास ठेवताना सावध रहा. काही मुद्दे समस्येत भर घालू शकतात. एखादं काम रखडण्याची आणि त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत बनण्याची शक्यता आहे. बेरोजगार व्यक्तीला नव्या संधी मिळू शकतील. आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा.

मिथुन (Gemini) : जोडीदारावर ताण येईल. आपली मन:स्थिती सुधारेल. चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचं कागदपत्र हरवण्याची भीती आहे. रखडलेलं काम पूर्ण होऊन नफा होईल. ऑनलाईन फसवणुकीची शक्यता, ती टाळण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहार करताना दक्ष रहा. आज कोणालाही उधार देऊ नका.

कर्क (Cancer) : भावनिकता आणि उदारता यांसारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवा. कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी आपले संशोधन पूर्ण करा. आज उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील. ऑफिसमधल्या अतिरिक्त कामामुळे अतिरिक्त धावपळ होईल. संध्याकाळी थकवा येईल. शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत. आपली इतरांवर चांगली छाप पाडाल. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील.

सिंह (Leo) : किरकोळ कारणी अधिकार्‍यांशी मतभेद टाळा. क्षुल्लक बाबी नजरेआड कराव्यात. इतरांच्या गोष्टीत लक्ष घालू नका. ऑफिसचं काम पूर्ण झाल्याने मनात आनंदाची भावना असेल. नोकरी किंवा उद्योग-व्यवसायात सुरू असलेल्या कष्टांमुळे अकल्पित यश प्राप्त कराल. आपल्याच कामाशी संलग्न रहा. तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो.

कन्या (Virgo) : नकारात्मक उपक्रम असलेल्या लोकांपासून दूर राहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. हातात पुरेसे पैसे मिळण्याचा आनंद घेता येईल. विरोधकांचे हेतू सफल होणार नाहीत. जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाचं नियोजन कराल. आर्थिक व्यवहार करताना दक्ष रहा. आज कोणालाही उधारी देऊ नका. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. नियोजित कामे करताना काही अडचणी येतील.

तुळ (Libra) : तुम्ही तुमच्या वातावरणात सकारात्मक बदल पाहू शकता. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. स्टॉक मार्केटमधून नफ्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसह चांगले नातेसंबंध ठेवा. भविष्यात तुम्हाला त्याचे लाभ मिळतील. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव आज बदलण्याची गरज आहे. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे.

वृश्‍चिक (Scorpio): सामाजिक कार्यात सावध राहा. बाहेर बदनामी करण्याचे प्रकारही घडत आहेत म्हणून व्यापारी वर्गाने गाफिल राहू नये. व्यापारात उत्तम संधी असेल. चांगलं काम करण्याच्या दृष्टीने मन आनंदी असेल. काही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात. आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. मेहनत व परिश्रम कायम ठेवा. उधार घेतलेले पैसे परत मिळण्याची वेळ योग्य नाही.

धनु (Sagittarius) : सल्लामसलत केल्याने तोडगा निघेल. स्वत:चे काम स्वत:च करा. कोर्टाच्या कामात दिवस जाईल. अथक श्रमाचा थकवा जाणवेल. आज कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधकदेखील तुमचं कौतुक करतील. आज सरकारी काम करून घेण्यात यशस्वी व्हाल. काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता. आवश्यक कागदपत्रे जपून ठेवा. नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn) : भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक एकत्रिकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया आणि मित्रांसोबत वेळ घालवू नये. ऑफिसमध्ये विनाकारण वाद होऊ शकतात. गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते. कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी आपले संशोधन पूर्ण करा.

कुंभ (Aquarious) : विचार न करता कोणतेही नवीन काम सुरू करू नका. व्यवसायात तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात. तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळेल. उपजीविकेच्या बाबतीत सुरू असलेले नवे प्रयत्न फळाला येतील. आज दानधर्म करावा. दुपारी हाताखालच्या कर्मचाऱ्यांचं सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिक सावध राहण्याची गरज आहे.

मीन (Pisces) : मुलांबाबत काही चांगली बातमी मिळू शकते. चुकीच्या कामात पैसा खर्च केल्याने ते बलवान होत आहे. उपजीविकेच्या साधनाच्या अनुषंगाने प्रगती होईल. एखाद्या कार्यक्रमात प्रतिष्ठेत वाढ होईल. ऑफिसच्या कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावं लागेल आणि त्यात नफा होईल. अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा.

Advertisement