SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार, राज्यात 5 लाख घरकुले बांधण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा..

राज्यात पुढील 100 दिवसांमध्ये 5 लाख घरकुले बांधणार असून सर्वसामान्यांचा गृहप्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. राज्यासाठी निधी कमी पडणार नाही. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितलं आहे. यावेळी पुरस्कार वितरण कार्यक्रमही मुंबईत पार पडला, त्यावेळी त्यांनी ही माहीती दिली.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, येत्या 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्दिष्ट ठेवले असून त्यानुसार आता ‘अमृत महाआवास योजना’ या योजनेच्या माध्यमातून 2022-23 मध्ये 5 लाख घरे पुढील 100 दिवसात बांधण्यात येणार आहेत. इतक्या कमी वेळेत राज्यात लाखो घरकुले बांधण्यात येणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश करू”, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Advertisement

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही “अमृत महाआवास योजनेच्या माध्यमातून निकषांत बसणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी मार्च 2023 पर्यंत 5 लाख घरकुले बांधण्यात येणार आहे. या बेघर आणि गरजू लोकांच्या व्यतिरिक्त राज्यातील इतर नागरिक जे महाआवास योजनेच्या निकषात बसत नाहीत, असे नागरिक निकषांत बसावे यासाठी नवीन योजना तयार करून ‘बेघरमुक्त महाराष्ट्र’ करण्याची तयारी करू”, अशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.

अमृत महाआवास अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माणचे संचालक डॉ.राजाराम दिघे आणि राज्यस्तरीय वरिष्ठ अधिकारी इ. उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement