SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

न्युझीलंडचा भारतावर शानदार विजय, लॅथम-विलियम्सनची रेकाॅर्डब्रेक भागीदारी..

टॉम लॅथम व कॅप्टन केन विलियम्सनच्या 200 हून अधिक धावांच्या भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा 7 विकेट्स राखून पराभव केला. भारताचे 307 धावांचे तगडे आव्हान न्युझीलंडने 48 षटकांतच गाठले. या विजयासह न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

गचाळ फिल्डिंग नि बाॅलिंग

Advertisement

गचाळ फिल्डिंग व गोलंदाजांकडे असलेली अनुभवाची कमतरता या सामन्यात स्पष्टपणे दिसून आली. या सामन्याद्वारे उमरान मलिक व अर्शदीप सिंग यांनी वन-डे मध्ये पदार्पण केले, पण त्यांना भारताला विजय मिळवून देता आला नाही.

टीम इंडियाच्या 307 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, न्यूझीलंडने सलामीवीर फिन अॅलन (22), डेव्हॉन कॉनवे (24) व डॅरेल मिचेल (11) यांना 88 धावांत गमावले होते. मात्र, त्यानंतर विलियम्सन व लॅथम यांनी डाव सावरला.

Advertisement

विलियम्सनच्या (नाबाद 94) तुलनेत लॅथम अधिक आक्रमक खेळला. 5 षटकार व 19 चौकार खेचताना त्याने नाबाद 145 धावा केल्या. भारताविरुद्धचे हे त्याचे दुसरे शतक ठरले. सामनावीर पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले. आता दुसरा सामना रविवारी (ता. 27) खेळवला जाणार आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement