SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अमिताभ बच्चन यांनी ठोठावले कोर्टाचे दार, दिल्ली हायकोर्टाचा मोठा निर्णय…

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकतीच दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परवानगीशिवाय कोणीही आपला आवाज, नाव किंवा चेहरा वापरू नये, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली होती.

प्रतिमा खराब होतेय..

Advertisement

लोकांची फसवणूक करण्यासाठी काही कंपन्या बच्चन यांचे नाव, आवाज व चेहऱ्याचा गैरवापर करीत होत्या. मात्र, त्यामुळे बच्चन यांची प्रतिमा खराब होत होती. वरिष्ठ वकील हरिश साळवे यांच्यामार्फत बच्चन यांनी कोर्टात धाव घेतली.

न्यायमूर्ती चावला यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. कोर्टाने बच्चन यांना दिलासा देताना, त्यांचे फोटो, नाव किंवा पर्सनॅलिटी ट्रेट्स त्वरित हटवण्याचे आदेश अथॉरिटी आणि टेलिकॉम डिपार्टमेंटला दिले आहेत.

Advertisement

बच्चन यांचे नाव व आवाजाचा गैरवापर करणाऱ्या फोन नंबरची माहितीही कोर्टाने टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरकडून मागवली आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित ऑनलाइन लिंक्स हटवण्याचे आदेश इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडरला दिले आहेत.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement