SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

क्रिकेट: भारताचे न्यूझीलंडला 307 धावांचे टार्गेट, श्रेयस अय्यर-धवनची तुफान फटकेबाजी..

भारत विरुद्ध न्यूझीलंड आज पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडमधील ईडन पार्क येथे सकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जात असून भारताने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत 306 धावांचा डोंगर उभा केला आहे. 50 षटकांचा खेळ पूर्ण झाला असून भारताकडून आज मोठी खेळी पाहायला मिळाली.

भारताकडून सलामीला आलेल्या शिखर धवनने 77 चेंडूत 72 धावा करून 13 चौकारांचा पाऊस पाडला तर शुभमन गिलने 65 चेंडूत एक चौकार मारत 50 धावा केल्या. यानंतर आजच्या सामन्यांमध्ये धमाकेदार खेळी श्रेयस अय्यरने केली असून त्याने 76 चेंडूत 80 धावा केल्या. तर यामध्ये त्याने चार चौकार व चार उत्तुंग षटकार मारले.

Advertisement

तसेच, संजू सॅमसनने 4 चौकार मारत 38 चेंडूत 36 धावा आणि वॉशिंग्टन सुंदरने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत फक्त 16 चेंडूत 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 37 धावा केल्या. याशिवाय ऋषभ पंतने 2 चौकारांसह 23 चेंडूत 15 धावा तर सूर्यकुमार यादवने 1 चौकारासह 3 चेंडूत 4 धावा व शार्दूल ठाकुरने 2 चेंडूत 1 धावा करून आपले योगदान केले.

आज भारत आणि न्यूझीलंड मध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी मजबूत असल्याचं दिसलं. आकर्षक फलंदाजी करत भारतीय संघाने आता न्यूझीलंडसमोर 307 धावांचे आव्हान ठेवले आहे. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने 3 विकेट्स, लॉकी फर्ग्युसनने 3 विकेट्स आणि ॲडम मिल्नने 1 विकेट घेतली आहे. सध्या न्यूझीलंडच्या 2 ओव्हरमध्ये बिनबाद 7 धावा झाल्या आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement