SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ टीव्हीला खरेदी करा अर्ध्या किंमतीत, फ्लिपकार्टवर धमाकेदार ऑफर..

ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर सध्या 43 इंच इनफिनिक्स कंपनीचा एलईडी टीव्ही ग्राहकांना अगदी स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. कारण फ्लिपकार्टवर या टीव्हीवर तब्बल 44% डिस्काउंट मिळत आहे. हा टीव्ही 24,999 रुपयांना फ्लिपकार्टवर लिस्ट झालेला असून जवळपास 11 हजार रुपयांची सूट मिळून हा टीव्ही 13,999 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

याशिवाय Infinix Y1 109 cm (43 inch) Full HD LED Smart Linux TV (43Y1) खरेदी करण्यासाठी अनेक ऑफर्सचा ग्राहकांना फायदा घेऊन 13,999 रुपये पेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करता येऊ शकतो. ग्राहकांना 44% सूटसह हा टीव्ही 13,999 खरेदी करता येईल आणि यामध्ये आणखी 10% म्हणजेच 1400 रुपयांची सूट मिळविण्याकरता हा टीव्ही तुम्हाला कोटक बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, सिटीबँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी करावा लागेल.

Advertisement

फ्लिपकार्ट वर हा आकर्षक टीव्ही खरेदी करताना जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या घरातील जुना टीव्ही देऊन तुम्ही नवा टीव्ही खरेदी करावा लागेल. तुम्हाला फक्त जुन्या टीव्हीची कंडिशन चांगली ठेवावी लागणार आहे, त्या कंडिशननुसार कंपनी तुम्हाला जास्तीत जास्त 11 हजार रुपये पर्यंतचा लाभ देऊ शकते.

आकर्षक टीव्हीचे खास फीचर्स:

Advertisement

इनफिनिक्सचा हा टीव्ही 43 इंच डिस्प्लेसह येणार असून त्याचे रिझॉल्यूशन 1920×1080 पिक्सल तर रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज आहे. विशेष म्हणजे हा टीव्ही लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. मनोरंजनासाठी युट्यूब, प्राईम व्हीडिओ, झी-5, नेटफ्लिक्स सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळणार आहे. जबरदस्त ऑडिओ परफॉर्म्ससाठी 20 वॉट आउटपूटसह डॉल्बी ऑडिओचा सपोर्ट मिळणार आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्ट रिमोटसह वाय-फाय, ब्लूटूथ सपोर्ट, दोन एचडीएमआय पोर्ट्स, दोन यूएसबी पोर्ट्स सपोर्ट असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement