SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: क्रिकेटर दिनेश कार्तिक होणार निवृत्त? चाहत्यांना मोठा धक्का!

भारतीय संघासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून क्रिकेट खेळणाऱ्या दिग्गज विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिकबद्दल सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. कारण मागील आयपीएल सीझन गाजवणाऱ्या या खेळाडूने आता निवृत्तीचे संकेत दिले आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या, आयपीएलमध्ये फिनिशरची भूमिका निभावणारा खेळाडू दिनेश कार्तिक याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने क्रिकेटमधील आपली कारकिर्द दाखवत काही आठवणींना उजाळा दिला आहे. कार्तिकने अचानक निवृत्तीचा विचार केल्याने चाहते हताश झाल्याचे दिसले. काही चाहते “प्लिज आता निवृत्त होतोय असं म्हणू नको”, असं कमेंटमध्ये म्हटले आहेत.

Advertisement

दिनेश कार्तिकने इंस्टाग्राम वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे तो लवकरच निवृत्ती घेणार आहे असं दिसत आहे. त्याने अधिकृत घोषणा मात्र केली नाही, तरी यामुळे असं वाटतं की दिनेश कार्तिकने व्हिडिओद्वारे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान कार्तिकला नुकत्याच झालेल्या विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी देण्यात आली होती आणि त्याचे वडीलही थेट ऑस्ट्रेलियात त्याचा खेळ पाहण्यासाठी आले होते.

दिनेक कार्तिकने नेमकं काय म्हटलंय..?

Advertisement

दिनेश कार्तिकने एक भावनिक व्हीडिओ शेअर करत लिहिलं, “भारतासाठी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, पण आम्ही अंतिम ध्येयापासून मागे राहिलो. माझ्या आयुष्यात अनेक अविस्मरणीय क्षण आले आहेत, जे मला नेहमी आनंद देत राहतील. माझे सहकारी, प्रशिक्षक, मित्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला नेहमीच पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार. #DreamsDoComeTrue #T20WorldCup”, असं कार्तिकने म्हटलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement