SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

डिसेंबरमध्ये बॅंकांना 13 दिवस सुटी, आताच उरकून घ्या महत्वाची कामे…

डिसेंबरमध्ये बॅंकांना 13 दिवस सुटी, आताच उरकून घ्या महत्वाची कामे…

2022 मधील अखेरचा डिसेंबर महिना सुरु होण्यास अवघे 5 दिवस राहिले आहेत. या महिन्यात नाताळ, तसेच गुरु गोविंद सिंहजी जयंती, असे मोठे सण असल्याने देशभरातील बँका 13 दिवस, तर महाराष्ट्रात 6 दिवस बंद असतील.

Advertisement

‘आरबीआय’ने डिसेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्यांची यादी सादर केलीय. त्यानुसार दुसरा व चौथा शनिवार, तसेच रविवार व सण-उत्सवानिमित्त भारतातील बॅंका 13 दिवस बंद असतील. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या तारखांना सुट्या आहेत.

या दिवशी बॅंका बंद

Advertisement

देशात 3, 10, 12, 19, 24, 26, 29, 30, 31 तारखांना बँकांना सुट्टी असेल. तसेच, 4, 11, 18 व 25 डिसेंबरला रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल. यंदा नाताळ सण रविवारी आला आहे.

महाराष्ट्रातील सुट्या

Advertisement
  • रविवार – 4,11,18 व 28
  • दुसरा व चौथा शनिवार – 10 व 31

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement