SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

25 नोव्हेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध पहिला वनडे सामना, न्यूझीलंडने टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय; डीडी स्पोर्ट्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहा सामना

✒️ भारतातील सर्वात मोठी वॉटर कंपनी बिसलेरी आता टाटा समूहाची होणार, जवळपास 6 हजार ते 7 हजार कोटींमध्ये बिसलेरीची विक्री करण्याचा झाला निर्णय

Advertisement

✒️ आता भाविकांना वर्षातून एकदाच चारधाम यात्रा करता येणार, आधार कार्डचीही नोंदणी होणार; उत्तराखंड सरकार चारधाम यात्रेबाबत कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत

✒️ संयुक्त अरब अमिरातीने भारतीय प्रवाशांसाठी नियम बदलला; पासपोर्टवर आडनाव असणे आवश्यक, दोन्ही नावे नसल्यास व्हिसा मिळणार नाही

Advertisement

✒️ आयसीसीने वनडे संघांची रँकिंग जाहीर, इंग्लंड संघाने आपले अव्वल स्थान गमावले, न्यूझीलंड 114 अंकांसह पहिल्या स्थानी; भारत रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर

✒️ डिजिटल मीडियावर नजर ठेवण्यासाठी लवकरच नवीन कायदा आणला जाणार, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांची मोठी घोषणा

Advertisement

✒️ रितेश-जेनिलियाच्या ‘वेड’ चित्रपटाचाचा टीझर रिलीज, रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ येत्या 30 डिसेंबरला चित्रपटगृहांत रिलीज होणार

✒️ ओप्पोने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज ओप्पो रेनो 9 केली लाँच; देशांतर्गत बाजारात या सीरीज अंतर्गत रेनो 9, रेनो 9 प्रो, रेनो 9 प्रो प्लस स्मार्टफोन केले लॉंच

Advertisement

✒️ ‘इस्रो’ने नवा इतिहास रचतानाच ‘आरएच-200’ या साउंडिंग रॉकेटची केली यशस्वी चाचणी, तिरूअनंतपुरम येथील थुंबा किनाऱ्यावरून केले प्रक्षेपित

✒️ फिफा वर्ल्डकपमध्ये उरूग्वे आणि दक्षिण कोरियाचा कालचा सामना झाला टाय; तर दुसरीकडे ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने घानाला 3-2 ने दिली मात
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement