SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकींग: विक्रम गोखलेंचे निधन नाही, ते सध्या..

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याबद्दल काल (23 नोव्हें.) सोशल मीडियावर अफवा पसरल्या. अभिनेते विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास होता. काही दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुणे येथील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण काल रात्री त्यांचं निधन झाल्याच्या अफवा पसरल्या गेल्या. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

अभिनेते विक्रम गोखले यांच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना व समाजमाध्यमांना विनंती केली की, “कृपया विक्रम गोखले यांच्या निधन झाल्याच्या अफवा पसरवणं थांबवा, त्यांचं निधन झालं नसून ते काल कोमात गेल्याने त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच ते आता लाईफ सपोर्टवर आहेत, त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नयेत”, अशी माहीती गोखले कुटुंबीयांनी दिल्याचं समजतंय.

Advertisement

“प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाल्याच्या बातम्या अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाल्या पण त्या चुकीच्या असून ते सध्या लाईफ सपोर्टवर आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करा”, असे विक्रम गोखले यांच्या मुलीने सांगितले आहे.

अभिनेते विक्रम गोखले यांची 5 नोव्हेंबर पासून पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू असता त्यांची प्रकृती जराशी ठीक झाली होती पण नंतर पुन्हा बरं वाटत नसल्याने प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान सोशल मीडियावर चाहत्यांसोबतच अजय देवगण, जावेद जाफरी अशा काही सेलिब्रिटींनीही काल रात्री उशिरा गोखलेंना ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली होती. आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून मेडिकल बुलेटिन जारी केले जाणार आहे. यामुळे विक्रम गोखलेंच्या प्रकृतीबाबत अधिक माहीती मिळेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement