SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries) : अडकलेले पैसे मिळाल्याने आनंद होईल. वायफळ गोष्टींत वेळ वाया घालवू नका. एकावेळी एकच काम करा. लक्ष दिलं तर अनपेक्षित तोटा समजेल. व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्वाच्या चर्चेत आपल्या मतावर ठाम राहणार आहात. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल.

वृषभ (Taurus) : आजचा दिवस फारसा चांगला नाही. एखाद्या अचानक आलेल्या कामासाठी कर्ज काढावं लागेल. सही करण्यापूर्वी कागदपत्रं व्यवस्थित वाचा. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन:शांती मिळेल. नवीन प्रोजेक्ट सुरू करताना तुमच्या मनात विविध नकारात्मक विचार येतील.

Advertisement

मिथुन (Gemini) : घरातून निघण्यापूर्वी वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. महत्वाच्या कामासाठी पैशांची थोडीशी बचत करा. व्यवसायात नफा होईल. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे लोकांची कौतुकाची थाप मिळेल. राग आणि जिद्दीपणावर नियंत्रण ठेवा. कर्मचार्‍यांच्या उपक्रमांवर आणि ऑफिसात कामांवर बारीक लक्ष ठेवा.

कर्क (Cancer) : वायफळ गोष्टींमुळे टाईमपास करून घेऊ नका, नाहीतर तोटा होईल. अनेक नवीन संधी येतील. व्यवसायाचे निर्णय स्पष्टपणे विचार करून घ्या. दुपारनंतर परिस्थिती काहीशी प्रतिकूल असेल. कोणतीही महत्त्वाची योजना अपूर्ण राहू शकते. कौटुंबिक प्रकरणे पुढे जाऊ शकतात. कोणताही वाद संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करा.

Advertisement

सिंह (Leo) : आर्थिक बाबींमध्ये तुमचं नशीब साथ देईल. व्यावसायिकांना दिवस कटकटीचा राहू शकतो, पण वाद न करता काही विषय शांततेत मिटवा. आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. नवीन योजनेवर काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. मित्र किंवा नातेवाईकाशी वादामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. क्रेडिट कार्डसंबंधित व्यवहार करू नका.

कन्या (Virgo) : स्थिरस्थावर व्यवसायाची व्याप्ती वाढेल. ऑफिसात चोरी होऊ शकते. ई-कॉमर्स साईटमुळे ऑनलाईन फसवणुकीला तुम्ही बळी पडू शकता. स्वतःवरचा अतिआत्मविश्वासही आज नुकसान करू शकतो. घराबाहेर वावरताना राग काबूत ठेवा. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत.

Advertisement

तुळ (Libra) : दीर्घ काळ अडकलेले पैसे मिळतील. हे पैसे घरात खर्च न करता योग्य सल्ला घेऊन गुंतवा. एखाद्या योजनेमुळे भविष्यात चांगला नफा होईल. कामात व्यस्तता राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखाद्याला केलेली शिफारस तुम्हाला नकारात्मक परिणाम देईल. संध्याकाळी मित्रांसोबत आर्थिक व्यवहार जपून करा.

वृश्‍चिक (Scorpio): छोट्या व्यावसायिकांचे व्यवहार चांगले होतील. नोकरदारांना तोटा संभवतो. प्रवासात थांबताना सावध रहा. कुणालाही विचारपूर्वकच पैसे द्या. प्रियजनांबद्दलची निराशा तुम्हाला तणाव देईल. घरातील वडीलधाऱ्यांचा स्नेह आणि आशीर्वाद मिळेल. मित्राशी वैरभावना तुमचा मूड खराब करू शकते.

Advertisement

धनु (Sagittarius) : पैसे खर्च करताना दुपारी विचार करा, नाहीतर पश्चात्ताप करावा लागेल. अचानक आर्थिक फायदा होईल. डोळे बंद ठेवून कुणावर विश्वास ठेवू नका. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. तुमचे धाडस आणि कार्य नैतिकता चांगली राहील. तुमचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येणार नाहीत.

मकर (Capricorn) : ऑफिसात कष्ट करावे लागतील त्याचे उत्तम परिणामही होतील. कोणत्याही कंपनीसोबत कुठलाही करार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. गरजूंना मदत केल्याने तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल. लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. सकारात्मक दृष्टीकोन बाळगा. शेजाऱ्याशी वाद होऊ शकतो.

Advertisement

कुंभ (Aquarious) : अचानक आलेल्या अडचणींमुळे आर्थिक परिस्थिती खालावेल. बाहेरगावी गेल्यावर काही व्यवहारात कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज योग्य सल्ले देतील. परिस्थितीत कठोर निर्णय घेऊ नका, वाईट वागणूक सोडून द्या. तुमची सर्जनशीलता आणि उत्पादकता आज नक्की समोर येईल.

मीन (Pisces) : सगळ्यांना सोबत घेऊन चला. गावातील चुलत भावंडांशी वाद होऊ शकतो. खूप वर्षांपूर्वी एका योजनेत अडकवलेले पैसे अचानक घरी येतील. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील छोटीशी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

Advertisement