SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ही’ कार देणार तब्बल 315 किमी रेंज, वाचा दमदार इलेक्ट्रिक कारबद्दल..

देशात सध्या महागाईमुळे आणि नंतर दरवाढीमुळे टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्या वापरणे सामान्य नागरिकांना परवडेनासे झाले आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक स्कूटर किंवा इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणण्याचे काही कंपन्यांचे काम सुरू आहे. आता नुकतेच टाटा कंपनीची टाटा टिगोर ईव्ही नवीन रुपात बाजारात लॉंच झाली आहे, जाणून घेऊयात रेंज आणि फीचर्सबद्दल..

देशातील अग्रगण्य कंपनी टाटा मोटर्सने देखील काही बदल करत आणि अनेक नवीन खास गोष्टी आणत आपली अपडेटेड टिगोर ईव्ही मार्केटमध्ये लाँच केली आहे. खिशाला परवडणारी ही इव्ही 4 व्हेरिएंट्समध्ये कंपनीने लॉंच केली आहे आणि ही कार आकर्षक रेंजमुळे धुमाकूळ घालणार हे नक्की आहे.

Advertisement

टाटा टिगोरची व्हेरियंटनुसार एक्स शोरूम किंमत:

Tata Tigor XE ची किंमत 12.49 लाख, Tata Tigor XT ची किंमत 12.99 लाख, Tata Tigor XZ+ ची किंमत 13.49 लाख रुपये आणि Tata Tigor XZ + Lux ची किंमत 13.75 लाख रुपये आहे. लक्षात ठेवा की या एक्स शोरूम किंमती असून तुमच्या शहरात या किंमतीत बदल होऊ शकतो.

Advertisement

आकर्षक रेंज आणि धमाकेदार फीचर्स: टाटा कंपनीच्या या शानदार कार Tata Tigor EV मध्ये 26 किलोवॉट अवर लिक्विड कुल्ड आयपी 67 रेटेड बॅटरी पॅक दिले आहे, जे एक इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले असेल. ही इलेक्ट्रिक मोटर 74 बीएचपीची शक्ती आणि 170 एनएम टॉर्क निर्माण करेल.

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, ही कार एकदा फुल चार्ज केली की 315 किमीची रेंज देऊ शकते. साधारणतः हे तुमच्या स्पीडवर आणि चार्जिंग किती आहे, यावर अवलंबून असते. कारमध्ये कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, टीपीएमएस, टायर पंक्चर रिपेअर कीट, मल्टी मोड रेजेन व इतर खास फीचर्स कंपनीने दिले आहेत किंवा तुम्ही इव्ही चे नाव गुगलवर सर्च करून अधिकृत वेबसाईटवर सविस्तर माहीती घेऊ शकता.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement