SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पोलिस भरतीसाठी ‘या’ तारखेपासून मैदानी चाचणी, लेखी परीक्षा नवीन वर्षात होणार…?

राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस शिपाई व चालक पदाच्या 17,130 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पोलिस भरतीच्या प्रक्रियेला वेग आला असून, आतापर्यंत राज्यात जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे. इच्छुक उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांची संख्या आणखी वाढू शकते.

पोलिस भरती प्रक्रियेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील आरक्षणनिहाय जागांचा अंदाज घेऊन उमेदवार अर्ज भरत आहेत. या भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या भरतीसाठी तरुणांकडून मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारी सुरू आहे.

Advertisement

मैदानी चाचणी 50 गुणांची, तर लेखी परीक्षा 100 गुणांची असेल. प्रत्येकी एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. मैदानी चाचणीत किमान 40 टक्के गुण आवश्यक आहेत. पहिल्यांदा मैदानी चाचणी होईल व त्यातील उत्तीर्ण उमेदवारांची लेखी चाचणी होणार आहे.

12 डिसेंबरपासून मैदानी चाचणी?

Advertisement

उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल व अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी 7 दिवसांत कॉल लेटर पाठविले जाईल. उमेदवारांची मैदानी चाचणी 12 डिसेंबरपासून सुरु करण्याचे गृह विभागाचे नियोजन आहे. या मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी-2023 मध्ये होईल, असे सांगण्यात आले.

पोलिस भरतीसाठी राखीव गटातील उमेदवारांना नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यासाठी गृह विभागाने 1 एप्रिल 2021 ते 21 मार्च 2022 या काळातील नॉन क्रिमेलिअरची मूळ प्रत असावी, अशी अट घातली होती. त्यामुळे उमेदवारांचा गोंधळ उडाला. ही मुदत संपलेली असताना, तेव्हाचे क्रिमेलिअर कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला.

Advertisement

अखेर मागील उत्पन्नावर सद्यस्थितीत काढलेले नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्रही भरतीसाठी चालणार असल्याचा आदेश गृह विभागातील अधिकाऱ्यांनी दिल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement