SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धक्कादायक.. घरगुती वीजबिल महागणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय..

राज्य सरकारने वीज दरात किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वीजबिलात किमान 200 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

वीज खरेदी खर्च वाढल्याने महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. हा निधी 2021 मध्येच संपला. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये वीज खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली.

Advertisement

नोव्हेंबरमध्ये दरवाढीचे संकट

राज्य सरकारने विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता. त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्यात सामान्यांवर पुन्हा एकदा दरवाढीचे संकट आले आहे.

Advertisement

महावितरणने जुलैपासून वीज दरात 1.35 रुपये प्रति युनिट वाढ केली असून, इंधन दर आकारला जात आहे. ही मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. आता हा आकार 1.90 रुपये असू शकतो. इंधन समायोजन आकार न वाढवल्यास पुढील वर्षी वीज दरवाढ करावीच लागणार असल्याचे सांगण्यात आले.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement