SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बांग्लादेश दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, जाडेजाच्या जागी ‘या’ खेळाडूची निवड…

न्यूझीलंडनंतर भारतीय संघ बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 सामन्यांची वन-डे मालिका, तसेच दोन चार दिवशीय सामने खेळणार आहे. ‘बीसीसीआय’ने वन-डे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे.

रवींद्र जाडेजाला टीम इंडियात स्थान दिलं होतं, पण अद्यापही तो दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे तो या मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, यश दयाल याचेही नाव संघातून वगळण्यात आले आहे.

Advertisement

भारतीय संघात आता वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि शाहबाझ अहमद यांचा समावेश करण्यात आला आहे. अभिमन्यू इश्वरन याच्या नेतृत्वाखाली भारताचा ‘अ’ संघ चार दिवशीय मालिका खेळणार आहे.

वन-डे संघ –  रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.

Advertisement

भारत ‘अ’ संघ: अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रोहन कुनुमल, यशस्वी जैस्वाल, यश धुल, सर्फराज खान, तिलक वर्मा, उपेंद्र यादव (विकेटकीपर), सौरभ कुमार, राहुल चहर, जयंत यादव, मुकेश कुमार, नवदीप सैनी, अतिथ सेठ

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement