SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

18 वर्षांखालील मुलांनाही मिळणार ड्रायव्हिंग लायसन्स, फॉलो करा ‘ही’ सोपी प्रक्रिया…

कोणतंही वाहन चालवायचंं असेल, तर त्यासाठी लागते, ड्रायव्हिंग लायसन्स.. अर्थात वाहन चालवण्याचा अधिकृत परवाना.. आधी शिकाऊ व त्यानंतर एक महिन्याने कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करता येतो. मात्र, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 18 वर्षांची अट आहे. मात्र, आता 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनाही ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार आहे.

विशेष म्हणजे, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कोणतीही टेस्ट देण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केल्यावर फक्त सात दिवसांत ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते.

Advertisement

केवळ विना गिअरची गाडी

मोटार वाहन कायद्यानुसार, 16 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांनाही वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो, पण फक्त ‘लर्निंग लायसन्स’ मिळू शकते. हा परवाना मिळाल्यानंतर संंबंधित मुलगा केवळ विना गिअरची गाडी चालवू शकतात. गिअरसह वाहन चालवण्यासाठी कायमस्वरुपी ड्रायव्हिंग लायसन्स बनवावं लागतं नि त्यासाठी वयाची 18 वर्षांची अट कायम आहे.

Advertisement

16 ते 18 वर्षांखालील मुलांचे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या अगदी काही मिनिटांत ऑनलाइन अर्ज करू शकता. ही चाचणी उत्तीर्ण झाले, की लर्निंग लायसन्स सहज मिळू शकते. परंतु पक्का परवाना मिळवण्यासाठी तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे.

असा करा अर्ज

Advertisement
  • सर्वप्रथम https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do भेट द्या.
  • तेथे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याच्या पर्यायावर क्लिक करा.
  • नंतर आवश्यक कागदपत्रांची ‘आरटीओ’ पडताळणी करतील.
  • कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, सात दिवसांत लायसन्स मिळेल.
  • चाचणी न देता फक्त लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement