SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अजय देवगणचा ‘दृश्यम-2’ चित्रपट ठरला हिट, कमावले तब्बल ‘एवढे’ कोटी रुपये..

प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि तब्बू च्या अभिनयाच्या जोरावर 2015 साली प्रदर्शित झालेला दृश्यम चित्रपट आजदेखील बहुतांश लोकांच्या मनावर राज्य करत आहे. चित्रपटाची स्टोरी आणि वेळोवेळी पोलिसांच्या तावडीतून निसटण्यासाठी माईंड गेम खेळणाऱ्या विजय या पात्राची झलक आता प्रेक्षकांना पुन्हा बघायला मिळत असून चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसरा भाग ‘दृश्यम-2’ ला देखील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आहे.

आता बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम-2’ चित्रपट मोठा धमाका करत आहे. कारण या चित्रपटाने दररोज कोट्यवधीचा गल्ला जमवला आहे आणि आताही हा चित्रपट चालूच आहे. सध्या तुफान कमाई करणारा हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आहे. दृश्यम-2 चित्रपट रिलीज होऊन 6 दिवस झाले आहेत. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Advertisement

‘दृश्यम 2’ चित्रपटाचे कलेक्शन:

▪️ दृश्यम 2’चे पहिल्या दिवशी कलेक्शन – 15.38 कोटी.
▪️ दुसऱ्या दिवशी – 21.59 कोटींची कमाई.
▪️ तिसऱ्या दिवशी – 27.17 कोटींची कमाई.
▪️ चौथ्या दिवशी – 11.87 कोटी रुपये.
▪️ 5व्या दिवशी – 10.48 कोटी रुपये कमाई.
▪️ 6व्या दिवशी – 10 कोटी रुपये कमावले.
▪️ सध्या चित्रपटाची एकूण कमाई – 96.49 कोटी रुपये

Advertisement

📍 ‘दृश्यम 2’ हा विशेष म्हणजे फक्त 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे, जो भारतामध्ये विचार केला तर तब्बल 3302 स्क्रीन्सवर आणि ओव्हरसीजमध्ये 858 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा एकूण 4 हजाराहून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. तुम्हाला माहीतच असेल की, ‘दृश्यम 2’ हा एका मल्याळम सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement