SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

24 नोव्हेंबर 2022: सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ एलआयसी ने परिपत्रक जारी करुन दोन पॉलिसी केल्या बंद, एलआयसी जीवन अमर आणि एलआयसी टेक टर्म अशी या दोन पॉलिसींची नावे

✒️ केंद्रीय कामगार मंत्रालयाने अमेझॉन इंडियाला पाठवली नोटीस, कर्मचाऱ्यांना सक्तीने कामावरून कमी केल्याबद्दल मंत्रालयाने पाठवली होती नोटीस

Advertisement

✒️ अबुधाबी टी-10 लीग झाले सुरू, लीगमध्ये एकूण 8 संघ सहभागी; सुरेश रैना, हरभजन, श्रीशांत, स्टुअर्ट बिन्नीसह अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसणार

✒️ आता डायबेटिसचा (डायबेटिस टाइप -1) धोका 3 वर्षापर्यंत रोखणं शक्य होणार, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने टॅप्लिझुमॅब या औषधाला दिली मंजुरी

Advertisement

✒️ पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे विदेशी मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या चार चाकी वाहनावर कारवाई, पोलीसांनी 1 कोटी 5 लाखांचा विदेशी मद्यसाठा केला जप्त

✒️ साईबाबांच्या चरणी तब्बल 398 कोटींचे दान, कोरोना काळात हेच दान अवघे 92 कोटी एवढे; मागच्या 13 महिन्यांत साईचरणी 27 किलो सोने व 356 किलो चांदीचाही समावेश

Advertisement

✒️ भारताने ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-3 चे केले यशस्वी प्रक्षेपण, मारक क्षमता 3 हजार किमीपर्यंत

✒️ टेलिकॉम कनेक्शनमध्ये जिओचे पुन्हा वर्चस्व, सप्टेंबरमध्ये जिओने 7.2 लाख नवीन ग्राहक तर एअरटेलने 4.12 लाख ग्राहक जोडले

Advertisement

✒️ महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न: महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, सर्वोच्च न्यायालयात लढा देऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

✒️ जपानने फिफा विश्वचषकात चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीचा केला पराभव, जपानने जर्मनीला 1-2 अशा फरकाने केले पराभूत
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement