SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries) : पैसे देऊन समस्या सुटतील असं नाही, भोग भोगावेच लागतात. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. मनाची द्विधावस्था टाळावी. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. मनातील नसती शंका काढून टाकावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दिवसभर कामाची धांदल राहील. घरात शांतता ठेवाल. गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला.

वृषभ (Taurus) : एखादी घटना घडेल जी अनेक आठवणी देऊन जाईल. शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी अंतर्गत मांडणीत काही अडचण येऊ शकते. भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. कामे तुमच्या मनाप्रमाणे सहज पूर्ण होतील. नोकरदार व्यक्तींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. धार्मिक कामाकडे कल राहील.

Advertisement

मिथुन (Gemini) : आईला गुडघेदुखीचा त्रास असेल तर तिच्या तक्रारी येतील म्हणून वेळीच उपचार करा. मुलाकडून चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. जास्त विचार केल्याने तणाव निर्माण होतो. तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ देऊ नका. अनुकूलतेमुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

कर्क (Cancer) : आई, वडील भाऊ घरी असतील तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडणार आहेत. काही महत्त्वाची कामेही हाताबाहेर जाऊ शकतात. विरोधक करार करतील. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. बेरोजगार व्यक्तीला रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

सिंह (Leo) : काही विषयांवर घरच्यांशी परवानगी लागू शकते. आवडते पदार्थ चाखाल. परिश्रमाचे चीज होईल. मुलांबद्दलचा विश्वास दृढ होईल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो. कार्यक्षेत्राचा विकास आणि विस्तार होईल. आज काही काळापूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड मुश्कील होईल.

कन्या (Virgo) : नोकरी करून नवीन गाडी घरी येईल आणि आज शाबासकी मिळवाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चारचौघात प्रतिष्ठा कमवाल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. महत्त्वाचे व्यावसायिक करार मदार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा.एखादी व्यक्ती, बँक किंवा संस्थेकडून तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असलात, तर घेऊ नका, तोटा होईल.

Advertisement

तुळ (Libra) : समोरच्याचा फायदा करून द्याल, पण थोडंसं आपलंही बघाल. लोकांच्या कामात ढवळाढवळ करू नका. व्यापार क्षेत्रात लाभ होईल. सुखद वातावरण राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. वादांपासून लांब रहा. आनंदी वातावरण राहील. फसव्या लोकांपासून सावध राहावे. मेहनतीच्या जोरावर कामे कराल. दोन दिवस कर्जांबद्दलची चिंता वाढू शकेल.

वृश्‍चिक (Scorpio): पैसे कमावले तर आज घर खरेदी करू शकता. अडचणी आज देवालाच सांगा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे. आवडत्या छंदासाठी वेळ, पैसे खर्च कराल. तुमच्या सार्मथ्यात वाढ होईल. आवाससंबंधी समस्या सुटतील. नशिबाने संधी मिळू शकतील. नवनवीन कार्यक्रमात जाण्याची सुरुवात होईल.

Advertisement

धनु (Sagittarius) : आज निवांत बसाल तेव्हा एखाद्या गोष्टीचा छंद लागू शकतो. परखड बोलण्याने आपलीच माणसे दुरावतील. मानसिक संतुलन राहील. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा. अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रयत्न अपेक्षेप्रमाणे साथ देतील. समाधान नक्की वाटेल. व्यापारात फायदा होईल. कर्मचाऱ्यांमध्ये कामाच्या संदर्भात काही वाद होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn) : कोणीही नसेल तेव्हा घरात आज तुम्ही मनसोक्त हसाल. चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. घरासाठी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. दिवसभर कामाची धांदल राहील. कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरिष्ठांचे समाधान होईल आणि पगार वाढेल. रखडलेल्या कामाबद्दल चिंता करू नका. जुने काम पूर्ण होईल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : विनोद करायची वेळ येईल तेव्हा बोलून दाखवा. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. निर्भीडपणे कामे पूर्ण कराल. कार्यालयीन सहकारी उत्तम साथ देतील. जोडीदाराला खुश करावे. कार्यक्षमता वाढल्याने उत्साह वाढेल. तुम्हाला नवी ऑफरही मिळू शकेल. शहाणपणाने काम सुरू करा. लवकरच तुमचं ऑफिसमधील मोठं काम पूर्ण होईल.

मीन (Pisces) : एक कंपनी बंद पडली तरी आज नवीन काम सुरू करू वाटेल. काही काळापासून सुरू असलेले भांडण लगेच सोडवा. मनाची द्विधावस्था टाळावी. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. मनातील नसती शंका काढून टाकावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. आज धाडस नकोच. गुंतवणूक पुढे ढकलणं चांगलं राहील. भविष्यातील प्लॅन्सवर काम सुरू होण्याची वाट पाहू नका.

Advertisement