SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रवींद्र जाडेजाच्या घरात राडा, जाडेजाच्या बहिणीची भावजयीविरुद्ध निवडणूक आयोगात तक्रार

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा याच्या घरात सध्या वादळ सुरु आहे. त्याला निमित्त ठरलंय, गुजरात विधानसभा निवडणुकीचं.. त्यातूनच जाडेजाची पत्नी व बहिणींमध्ये नुकताच जोरदार राडा झाल्याचं समोर आलंय..

गुजरात विधानसभेच्या जामनगर उत्तर मतदार संघात भाजपकडून रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा निवडणुक लढत आहे, दुसरीकडे जाडेजाची बहीण नयनाबा काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करतेय. त्यातून एकमेकींवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.

Advertisement

निवडणूक आयोगात तक्रार

नयनाबा हिने रिवाबा विरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. सहानुभूती मिळवण्यासाठी रिवाबा लहान मुलांचा वापर करीत असून, त्याला एकप्रकारे बालमजुरी म्हणतात, असा आरोप नयनाबा हिने केला आहे.

Advertisement

रिवाबा ही राजकोट पश्चिम येथील मतदार असून, ती जामनगर उत्तरमध्ये मते कशी मागू शकते? उमेदवारी अर्जात अधिकृत नाव रेवा सिंग हरदेव सिंग सोलंकी असून, जाडेजा नावाचा फायदा घेण्यासाठी तिने आपल्या नावासोबत रवींद्र जडेजाचे नाव कंसात टाकल्याचा आरोप केला आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement