SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

यूट्यूबचे शॉर्ट व्हीडिओ व्हॉट्सॲप स्टेटस कसं ठेवाल? वापरा ‘ही’ सोपी पद्धत..

यूट्यूब पाहत असताना आपण अनेक व्हिडीओ तर पाहतोच पण लहान व्हिडीओ ज्याला आपण यूट्यूब शॉर्ट म्हणतो, ते देखील पाहण्याचा आपण आनंद घेत असतो. कोणी-कोणी तर सकाळपासून काम करताना येणारा थकवा घालवण्यासाठी रात्री निवांत इंस्टाग्राम, फेसबुक सोबतच यूट्यूबवरील शॉर्टस् पाहत मनोरंजन करतात.

जर तुम्हाला व्हॉट्सॲपवर स्टेटस अपलोड करायची सवय असेल किंवा असं समजा की तुम्हाला यूट्यूब पाहता पाहता एखादं शॉर्ट व्हिडीओ आवडलंच आणि ते तुम्हाला व्हॉट्सॲपवर अपलोड करू वाटले तर नेमकं त्यासाठी काय करावं लागेल, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी एका वेबसाईटला तुम्हाला भेट देऊन आधी यूट्यूब शॉर्ट व्हिडीओ डाऊनलोड करावं लागेल, त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा..

Advertisement

▪️ जेव्हा तुम्ही युट्यूब अ‍ॅप ओपन कराल तेव्हा अ‍ॅपमध्ये सर्वात खाली शॉर्टस् असा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा. आता जर तुम्हाला एखादं शॉर्ट व्हिडिओ आवडलं तर त्या व्हिडिओवर थांबून राहा.

▪️ आता उजव्या बाजूस काही पर्याय दिसत असतील तिथे ‘शेअर’ या पर्यायावर क्लिक करा. आता समोर आलेल्या अनेक पर्यायांमध्ये पहिल्या क्रमांकावर येणाऱ्या ‘कॉपी लिंक’ या पर्यायावर क्लिक करा.

Advertisement

▪️लिंक कॉपी झाल्याचं तुम्हाला दिसेल तेव्हा गूगलवर जाऊन Shortsnoob.com ही वेबसाईट सर्च करा आणि ओपन करा.

▪️ वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ‘यूट्यूब शॉर्टस् डाऊनलोडर’ असं नाव दिसून खाली एक बॉक्स दिसेल जिथे ‘पेस्ट लिंक हिअर’ असं लिहिलेलं असेल तिथे तुम्ही कॉपी केलेली व्हिडिओची लिंक पेस्ट करून ‘सर्च’ वर क्लिक करा.

Advertisement

▪️ आता तुम्हाला हव्या असणाऱ्या व्हिडीओच्या क्वालिटीनुसार डाऊनलोड पर्यावर क्लिक करावं लागेल आणि तुमच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ डाऊनलोड होईल. आता हे व्हिडीओ तुम्ही तुमच्या गॅलरीतून व्हॉट्सॲपवर अपलोड करू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement