SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लहान मुलांच्या आधार कार्डमध्ये मोठा बदल, ‘युआयडीएआय’चा महत्वपूर्ण निर्णय

आधार कार्ड आता लहान मुलांसाठीही अनिवार्य आहे. 5 वर्षांखालील मुलांकडे आधार कार्ड असणं अनिवार्य केले आहे. त्यास ‘बाल आधार कार्ड’ असं म्हटलं जात असून, त्याचा रंग निळा आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून विविध कामांसाठी हे आधार कार्ड वापरले जाते. आता तर थेट नवजात बालकालाही जन्मासोबतच आधार नोंदणी मिळणार आहे.

आधार कार्ड जारी करणाऱ्या ‘यूआयडीएआय’ नुकतेच बाल आधारबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार, आता 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्याही आधार कार्डसाठी बायोमेट्रिक माहिती अपडेट करणे प्राधिकरणाने बंधनकारक केले आहे. याबाबत प्राधिकरणाने एक ट्विट केले असून, त्यात ही माहिती दिली आहे.

Advertisement

ट्विटमध्ये असं म्हटलंय, की 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे अनिवार्य असून, ही संपूर्ण प्रक्रिया मोफत असेल. बायोमेट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कोणताही बदल होणार नाही. मुलांचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

आधारसाठी अर्ज प्रक्रिया

Advertisement
  • सर्वप्रथम ‘युआयडीएआय’च्या uidai.gov.in वेबसाईटला भेट द्या.
  • आधार कार्ड रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा.
  • मुलाचं नाव, पालकांचे नाव, पत्ता, फोन क्रमांक अशी आवश्यक माहिती भरा.
  • सर्व माहिती पुन्हा एकदा पडताळून सबमिट करा. नंतर अपॉईंटमेंटवर क्लिक करा.
  • संबंधितांना आयडी प्रुफ, पत्त्याचा पुरावा, डेट ऑफ बर्थ डेटआणि रेफरन्स नंबरसारख्या कागदपत्रांची आवश्यकता असेल.
  • नंतर आधार कर्मचारी पुढील प्रक्रिया पूर्ण करुन एक ॲक्नॉलेजमेंट नंबर देईल.
  • 60 दिवसांच्या आत आधार कार्ड तुम्हाला तुमच्या पत्त्यावर मिळून जाईल.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement