SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries) : स्पष्टता असणं भविष्याच्या दृष्टीने उत्तम राहील. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. व्यावसायिकांना चांगला दिवस असेल. परिस्थितीनुसार काम करू शकाल. मुलांबाबत काही चांगली बातमी मिळू शकते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, आपोआप समस्या सुटतील. नोकरीत सुस्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल, त्यामुळे प्रयत्न करत राहा.

वृषभ (Taurus) : कुटुंबीयांचा सपोर्ट मिळेल. काम करताना मनात कोणतीही शंका आणू नका. व्यायामाचा कंटाळा करू नका. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. नातेवाईक किंवा मित्राच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नका. कोणतंही काम करताना आत्मविश्वासाने करा. कामे धाडसाने पार पाडाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

मिथुन (Gemini) : जमीन-इमारत आदी बाबींमधून आर्थिक लाभांची शक्यता. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. विद्या-र्थ्यानी स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. राजकीय संपर्कातून लाभ होईल. आपल्या निर्णयावर ठाम राहाल. मुद्द्यावर बोला, म्हणजे खरेपणा दिसून येईल. व्यवसायात वाढ होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क (Cancer) : जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करा. आई-वडील आणि वडीलधाऱ्यांबद्दल मनात सेवेची भावना निर्माण होईल. प्रगतीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. नम्रपणे बोलून आपला मान राखाल. आई आणि वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.


सिंह (Leo) : भागीदारीच्या बाबतीत निर्णय घ्या. कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. राजकीय संपर्कातून लाभ होईल. शत्रूंना भीती वाटेल. घरातील व्यक्तींना आपण जवळ वाटत असाल, तर चांगली गोष्ट आहे. शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या (Virgo) : जुनी गाडी घेऊन दिवस अनुकूल ठरेल. पती-पत्नी दोघेही एकमेकांच्या भावना समजून घेतील. जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे. जोडीदाराची मानसिकता समजून घ्या. तुमचे अधिकार क्षेत्र वाढेल. जमिनीची प्रकरणे जरा जपून हाताळा. शाळेत जाताना आज अभ्यास पूर्ण कराल आणि शाबासकी मिळवाल.

तुळ (Libra) : अति हाव तुम्हाला कर्जाच्या खाईत लोटू शकते. बोलण्यातील कटुता टाळा. जुन्या पुस्तकांचे वाचन कराल. मानसिक चंचलतेला आवर घालावी. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. आज नक्की आनंदात वाढ होईल. भांडण करून तोटा होईल, म्हणून समजूतदारपणे आपला आणि समोरच्याचा फायदा करून घ्याल.

वृश्‍चिक (Scorpio) : घरातील उणीदुणी घरातच ठेवा. शासकिय गोष्टींना मान्यता मिळेल. जोडीदाराच्या गरजांकडे लक्ष द्यावे. सुख-शांतीचे वातावरण राहील. उत्साहजनक वार्ता मिळतील. लेखन कार्यात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. कला क्षेत्रात उडी घ्याल, पैसे मात्र कमवायला खूप वेळ जाईल. घरी वाद नको याची काळजी घ्याल कारण घर एक राहणार आहे.

Advertisement


धनु (Sagittarius) : स्वच्छता तुमचं रक्षण करेल. सर्दी ताप असं काही त्रास देऊ शकतं. कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचा प्रभाव पडेल. भावंडांमधे क्षुल्लक कारणाने कटुता येईल. आपल्या निर्णयावर ठाम राहाल. मन उदास राहू शकते. आज बाहेर फिरण्यास जाऊ वाटेल आणि शेकोटीत मनसोक्त गप्पा माराव्याशा वाटतील. फक्त आपणच काळजी न घेतलेली बरी.

मकर (Capricorn) : गावात गेलात तर लोकांशी जवळीक वाढेल. नोकरदार व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. महत्वाची देणीघेणी असतील तर आज ती पटकन उरकून घ्या अन्यथा पैसे बुडीत खात्यात जातील. आज रात्री तुम्ही मनसोक्त हसाल.

कुंभ (Aquarious) : ऑफिसमधून आल्यावर आराम करा. पत्नीशी बोलल्यानंतर मूड छान होईल. आपली इच्छा असेल तर दिवास्वप्नही खरी ठरू शकतात. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहाणे आवश्यक. व्यवहारात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, म्हणून कागदपत्रे नीट बनवा. जवळच्या लोकांसोबत नेहमी प्रामाणिक राहाल.

मीन (Pisces) : दुसऱ्यासोबत आजतरी वादविवादात पडू नका. जुन्या पुस्तकांचे वाचन कराल. मानसिक चंचलतेला आवर घालावी. आज बाहेर पडाल तेव्हा शासकिय गोष्टींना मान्यता मिळेल. विचार न करता कोणतेही नवीन काम सुरू करू नका. घरातील वातावरण चांगल्या रीतीने हाताळा म्हणजे टेन्शन कमी राहील. आज लहान मुलांसोबत खेळू वाटेल म्हणून सुट्टी घ्याल.

Advertisement