SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

गुड न्यूज : ‘पर्ल्स’च्या गुंतवणुकदारांना पैसे परत मिळणार, लगेच करा ‘हे’ काम….

‘पीएसीएल इंडिया लिमिटेड’, अर्थात ‘पर्ल्स’ हे नाव कोणताही गुंतवणूदार विसरू शकत नाही. भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून अनेकांनी आपल्या आयुष्याची पूंजी या कंपनीत गुंतवली होती. मोठ्या शहरांपासून गाव-खेड्यातील वाडी-वस्तीपर्यंत या कंपनीने अगदी कमी वेळेत आपला विस्तार केला होता.

मात्र, एके दिवशी अचानक सारं काही संपलं.. गुंतवणूकदार रात्रीतून उघड्यावर आले. एजंट तोंड लपवू लागले. देशभरातील लोकांनी या कंपनीत पैसे गुंतवले होते. अखेर या कंपनीचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला. त्यानंतर निवृत्त न्यायमूर्ती लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली. या समितीने ‘पर्ल्स’च्या गुंतवणूकदारांसाठी परतावा योजनाही आणली.

Advertisement

गुंतवणूकदारांना पैसे परत देणे सुरु

जानेवारी 2020 पासून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरु आहे. पहिल्या वेळी 5000 रुपयांपर्यंत परतावा देण्यात आला. त्यानंतर जानेवारी 2021 मध्ये गुंतवणूकदारांना 10,000 रुपयांचा परतावा देण्यात आला. आता यंदा 10,001 ते 15000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांकडून अर्ज मागविले असून, एप्रिल 2022 पासून त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Advertisement

आपले हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी गुंतवणूकीचे प्रमाणपत्र जमा करुन घेतले जात आहे. ज्या गुंतवणूकदारांनी दावा दाखल केला आहे, त्यासाठी गुंतवणुकीचे प्रमाणपत्रही दिले आहे. पण, त्यांच्या अर्जात काही त्रूटी राहिल्या आहेत, काहीं जणांकडून चुका झाल्या आहेत. आता त्यात ऑनलाईन दुरुस्ती करता येणार आहे.

अर्जात काही चुका झालेल्या असतील किंवा काही त्रूटी असल्यास sebipaclrefund.co.in या वेबसाईटवर ऑनलाईन दुरुस्त करता येणार आहेत. त्यासाठी गुंतवणुकदारांना 31 जानेवारी 2023 पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर दुरुस्ती करता येणार नाही.

Advertisement

ज्या गुंतवणूकदारांनी 15,000 रुपयांसाठी दावा दाखल केला होता, त्यांना त्यांची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेकांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली असल्याचा दावा ‘सेबी’ने केला आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement