SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारताने न्युझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, दुसरा टी-20 सामना झाला टाय.. 

भारत विरुद्ध न्युझीलंडमधील तिसरा टी-20 सामना टाय झाल्याने टीम इंडियाने 3 सामन्यांची ही मालिका 1-0 अशी जिंकली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारताने दुसरी टी-20 सीरीज जिंकली, याआधी आयर्लंड विरुद्धची मालिका जिंकली होती.

न्युझीलंडचा कॅप्टन डेनाॅय कॅनव्हे याने नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र, मोहम्मद सिराज व अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी 4 विकेट घेताना, न्युझीलंडच्या धावांना ब्रेक लावला. काॅन्व्हे (59) व फिलिप्स (54) यांच्या फलंदाजीमुळे न्युझीलंडने 160 धावांचे लक्ष्य दिले होते.

Advertisement

भारताची आक्रमक सुरुवात

धावांचा पाठलाग करताना, पावसाची शक्यता लक्षात घेऊन भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक बॅटिंग केली. मात्र, त्या नादात भारताच्या लवकर विकेट पडल्या, तरी भारताचा रनरेट चांगला होता.

Advertisement

पंत (11), किशन (10), सूर्यकुमार यादव (13) व श्रेयस अय्यर (0) स्वस्तात बाद झाल्यावर हार्दिक पांड्याने (नाबाद 30) भारताचा डाव सावरला.

9 ओव्हरमध्ये 75 धावा झालेल्या असताना, पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढतच गेला. डकवर्थ लुईस नियमानुसार, भारताला विजयासाठी अवघी 1 धाव कमी पडल्याने सामना टाय झाला. सूर्याला मालिकावीर, तर सिराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement