SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘व्हॉट्स अ‍ॅप’मध्ये येणार स्क्रिन लाॅकची सुविधा? युजर्सच्या सुरक्षेत होणार वाढ..

व्हॉट्स अ‍ॅपच्या सुरक्षेत आता वाढ होणार असून, त्यासाठी खास फीचर आणले जाणार आहे. त्यामुळे तुमच्या फोनमधील व्हॉट्स अ‍ॅपमध्ये कोणालाही अनधिकृतरित्या प्रवेश करता येणार नाही.

‘मेटा’च्या मालकीच्या व्हॉट्स अ‍ॅप या मॅसेजिंग अ‍ॅपमध्ये ही फीचर विकसीत केले जात आहे. त्यामुळे हे फिचर कधीपर्यंत सुरु होऊल, याची माहिती मिळाली नाही.

Advertisement

कसे असेल फीचर?

  • व्हॉट्स अ‍ॅप वेब किंवा डेस्कटॉपवर हे फीचर उपलब्ध नाही.
  • व्हॉट्स अ‍ॅप सुरु करताना, प्रत्येक वेळी युजर्सला पासवर्ड टाकावा लागेल.
  • हे फीचर सुरु ठेवायचे की नाही, हे युजर्सला ठरवता येईल.
  • फीचरचा पासवर्ड व्हॉट्सअ‍ॅप सोबत शेअर केला जाणार नाही. युजर्सच्या पातळीवरच राहील.
  • पासवर्ड विसरल्यास, अ‍ॅपमधून लॉग आउट करावं लागेल.
  • क्यूआर कोडशी लिंक करून पुन्हा लॉग इन करता येईल.
  • फीचरमध्ये फिंगर प्रिंट सेंन्सरपण लवकरच उपलब्ध होईल.

📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement