SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टी-20 वर्ल्ड कप-2024 होणार अधिक रंगतदार, नवे ठिकाण, नवे नियम, नवे फाॅरमॅट…

ऑस्ट्रेलियातील टी-20 स्पर्धेत इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव करुन विजेतेपद आपल्या नावावर केले. त्यानंतर आतापासून क्रिकेट चाहत्यांसह जगभरातील संघांना पुढच्या टी-20 वर्ल्ड कपचे वेध लागले आहेत. 2024 मध्ये हा टी-20 वर्ल्ड कप होणार असून, त्यात मोठ्या प्रमाणात बदल असणार आहेत.

अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त यजमान पदाखाली हा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे. अमेरिकेत प्रथमच टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा होत असून, नव्या ठिकाणी स्पर्धेचा फॉरमॅटही नवा असणार आहे. ही स्पर्धा नेमकी कशी होणार आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

Advertisement

स्पर्धेसाठी पात्र संघ

अमेरिका व वेस्ट इंडिज या स्पर्धेचे यजमान असल्याने, या दोन्ही संघांचा समावेश ‘टाॅप-12’मध्ये केला आहे. 2022 च्या वर्ल्ड कपमधील अव्वल 8 संघही पात्र ठरले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्युझीलंड, श्रीलंका, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका व नेदरलँड्स या संघांचा समावेश आहे. आयसीसी रँकिंगनुसार अफगाणिस्तान व बांग्लादेश संघही पात्र ठरले आहेत.

Advertisement

असा असणार फॉरमॅट….

  • 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धेत 20 संघांचा सहभाग असेल.
  • ही स्पर्धा बाद फेरीपूर्वी दोन टप्प्यांत खेळवली जाणार आहे.
  • 2021 आणि 2022 च्या स्पर्धेत पात्रता फेरी व सुपर-12 असा फॉरमॅट होता. 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये 20 संघांची चार गटांत विभागणी होईल.
  • प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील.
  • ‘सुपर-8’ मध्ये दोन गटांत सामने होतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सेमी फायनल खेळतील.

वेस्ट इंडिजचा संघ यंदा पात्रता फेरीतच बाद झाला. मात्र, आता हा देश स्पर्धेचा यजमान असल्याने अमेरिकेसह हा संघ थेट पात्र ठरला आहे. अन्य 8 संघांसाठी पात्रता फेरीचे सामने होणार आहेत.

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement