SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

थंडीचा कडाका ‘या’ जिल्ह्यांत कायम, राज्यात कुठे सर्वाधिक गारठा, वाचा..

महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी थंडी तशी उशिराच सुरू झाली. पण थंडीची सुरुवात नोव्हेंबरमध्ये जरी झाली तरी थंडीमध्ये अचानक वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांत मागच्या दोन ते तीन दिवसांपासून बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली आलं आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असो की मराठवाडा सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरु झाला आहे.

राज्यातील उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यात तापमानात खूपच घट पाहायला मिळाली आहे. काश्मीर, उत्तराखंड, लडाखमध्ये बर्फवृष्टी होत असून उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांनी देशात थंडी वाढत आहे. प्रामुख्याने नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच भागात 10℃ च्या खाली तापमान आलं आहे.

Advertisement

राज्यात कुठे किमान तापमान…?

▪️ मराठवाड्यातील परभणीत आजचं तापमान 8 अंश सेल्सिअस तर काल (20 नोव्हेंबर) तापमान 8.3 अंश सेल्सिअस होतं.

Advertisement

▪️ अहमदनगरमध्ये काल 9.8 अंश सेल्सिअस आणि जिल्ह्यातील राहुरी येथे 9.7 अंश सेल्सिअस तापमान.

▪️ नाशिकमधील ओझर येथे रविवारी 6 अंश सेल्सिअस तापमान होते. तर यंदाच्या वर्षीही सध्या निफाडमध्ये किमान तापमान 7 अंश सेल्सिअसच्या असपास आहे.

Advertisement

▪️ मुंबई शहरातील किमान तापमान 17.5 अंश सेल्सिअस, कर्जतमध्ये 14 अंश सेल्सिअस तर लोणावळ्यात 13.8 अंश सेल्सिअस

▪️ पुण्यातील तळेगाव स्टेशनवर 10 अंश सेल्सिअस तर पाषाणमध्ये किमान तापमान 8.7अंश सेल्सिअसवर

Advertisement

▪️ महाबळेश्वरमधील तापमान रविवारी 10℃ वरून 8 अंशावर तर वेण्णालेकमधील तापमान 6 अंश सेल्सिअसवर आले होते.

▪️ नंदुरबार जिल्ह्यात सपाटी भागात तापमान 10 अंश तर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये तापमान 8 अंश सेल्सिअसपेक्षा कमी.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement