SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सूर्याचे आक्रमक शतक, भारताचा न्युझीलंडवर दणदणीत विजय..!

स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज शतकासह भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्युझीलंडचा 65 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

न्युझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनने टाॅस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऋषभ पंत (6) लवकर बाद झाल्यावर ईशान किशन (36) व सूर्यकुमारने आक्रमक फलंदाजी केली.

Advertisement

सूर्याचे आक्रमक शतक

सूर्यकुमारने अवघ्या 51 चेंडूंत 111 धावा फटकावल्या. मात्र, इतर फलंदाज स्वस्तातच माघारी परतले. सूर्याच्या बॅटिंगच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचे तगडे आव्हान ठेवले.

Advertisement

न्युझीलंडच्या डावात सलामीवीर फिन एलन भुवीच्या दुसऱ्याच बाॅलवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विल्यमसनने (61) डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्यांचा सगळा डाव 126 धावांत आटोपला.

अष्टपैलू खेळाडू दीपक हुडाने केवळ 10 धावांत 4 गडी बाद केले. सिराज व चहल यांनी प्रत्येकी 2, तर भुवनेश्वर कुमार व सुंदर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Advertisement

आक्रमक शतक ठोकणाऱ्या सूर्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. मालिकेतील तिसरा व अंतिम सामना येत्या 22 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement