SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारत- न्युझीलंडमधील दुसऱ्या टी-20 सामन्यावरही पावसाचे सावट, चाहत्यांमध्ये निराशा..

भारत व न्यूझीलंड यांच्यातील टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज माउंट माउंगानुई येथे होत आहे. पावसामुळे वेलिंग्टनमधील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याचे दिसते.

हवामान विभागाचा अंदाज

Advertisement

माउंट माउंगानुई येथे सध्या 15 ते 21 अंश सेल्सिअस तापमान असून, दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. सकाळी हलक्या पावसाची शक्यता असून, दुपारनंतर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

वेलिंग्टनमधील पहिला सामना नाणेफक होण्याआधीच रद्द करावा लागला होता. त्यानंतर पावसामुळे आजचा दुसरा सामनाही रद्द होण्याची भीती चाहत्यांना वाटत आहे. सध्या दोन्ही संघ माउंट माउंगानुई येथे पोहोचले आहेत.

Advertisement

पावसामुळे दुसरा टी-20 सामना रद्द झाल्यास, 3 सामन्यांच्या या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना निर्णायक ठरु शकतो. जो संघ तिसरा टी-20 सामना जिंकेल, तो मालिकेचा विजेता ठरणार आहे.

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement