SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महाराष्ट्राला हुडहुडी भरली, ‘या’ शहरात नोंदवले गेले सर्वात कमी तापमान..

आता थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. राज्यात यंदाच्या हंगामातील नीच्चांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (ता. 18) झाली. महाबळेश्वरपेक्षाही जळगाव हे थंड हवेचे ठिकाण ठरलं आहे.

जळगावमध्ये 10.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. त्या खालोखाल नाशिक व पुण्यात 11.2 अंश सेल्सिअस, तर अहमदनगरमध्ये 11.4 अंश सेल्सिअस तापमान होते. महाबळेश्वरमध्ये 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Advertisement

आणखी थंडी वाढणार

उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील तापमानाचा पारा घसरल्याचे सांगितलं जाते. तसेच, पुढील चार दिवसांत थंडीचे प्रमाण आणखी वाढण्याची अंदाज आहे.

Advertisement

राज्यातील जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, नागपूर आणि सांगली येथील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहेत. मराठवाडा, विदर्भातही पारा घसरला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय, उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टीचा अंदाज असल्याने महाराष्ट्रातही त्याचा परिणाम दिसू शकतो.

Advertisement

📣 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉 https://www.spreaditnow.in

Advertisement